शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

मुंबईतून बॉलीवुड संपवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 11:27 PM

राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन यासाठी एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केली आहेत. एसओपी निश्चित झाल्यानंतर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (CM Uddhav Thackeray)

मुंबई - 'मुंबईतून बॉलीवूडला संपवण्याचे अथवा इतरत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. सध्या बॉलीवूडला एका विशिष्ट वर्गाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे वेदना दायक आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला. यावेळी मुंबईचे महत्व सांगताना ठाकरे म्हणाले, 'मुंबई ही महाराष्ट्राची केवळ आर्थिक राजधानीच नाही, तर सांस्कृतिक राजधानीही आहे. आज बॉलीवुडमध्येही हॉलीवुड सिनेमांस तोडीस तोड चित्रपट तयाह होत आहेत. संपूर्ण जगभरात बॉलीवुड सिनेमांचा चाहतावर्ग आहे. हे क्षेत्र, अनेकांना रोजगार देते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही लोक या क्षेत्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतून बॉलीवुड संपवण्याचा अथवा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे सहन केले जाणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी, राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन यासाठी एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केली आहेत. एसओपी निश्चित झाल्यानंतर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सिनेमागृहे गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वन दिले.

राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा सुरू - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने  नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये आजपासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजारसुद्धा सुरू करण्यास परवानगी  दिली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईShiv Senaशिवसेना