शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंचं मिशन ४०! एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना शह देण्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 7:52 PM

केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यानं उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळलं, ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यामुळे शिंदे यांच्यासह ४० आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. ठाकरे-शिंदे वादात सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे २ गट पक्षात पडले आहेत. 

आता उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या ४० आमदारांना मतदारसंघात पाडण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल लागेल तेव्हा लागेल परंतु निवडणुकीच्या मैदानात शिंदेंना शह देण्याचा डाव ठाकरेंकडून आखला जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा-विधानसभा निवडणुकीची ठाकरेंनी आत्तापासून तयारी सुरू केलीय. मातोश्रीवर रोज बैठका लावल्या जात आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला जात आहे. 

यात मुख्यत: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत याठिकाणी पुढील निवडणुकीत कुणाला उभे करायचं याचा आढावा घेतला जात आहे. इतकेच नाही तर त्या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकाला पुढे आणून बंडखोरांविरोधात उभे करण्याचंही ठाकरे विचार करत आहेत. 

मातोश्रीवरच्या बैठकीत काय ठरलं?एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बंडखोरी झाली. त्यामुळे या विभागातील प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. त्यातील ४० मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात धुसपूस होती का? कुठला पदाधिकारी आमदाराला टक्कर देऊ शकतो? त्याचसोबत इतर पक्षातील कोण नेता बंडखोराला आव्हान देण्यास सक्षम आहे याचा आढावा घेतला जात आहे.

केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री काळात केलेली कामे, विरोधकांच्या धोरणांमुळे राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेल्याचा मुद्दा असे अनेक विषय आगामी काळात पुढे आणले जाणार आहेत. मात्र येत्या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचं चित्र असल्याने उद्धव ठाकरेंसाठी हे आव्हानात्मक आहे. मात्र ४० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघ जास्तीत जास्त जागा मिळवायच्यात असं ठाकरेंकडून प्लॅन आखण्यात आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना