मुंबई-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करतानाच बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे चक्क आभार व्यक्त केले.
माशाचे अश्रू दिसत नाहीत; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख
"ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.
पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
"आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलू लागलेत. ज्यांनी आजवर ठाकरे कुटुंबीयांबाबत विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. मग तुमचं प्रेम खरं की खोटं? माझ्याबद्दल आजवर ते लोक जे बोलले ते तुम्हाला लखलाभ", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
११ जुलैचा निकाल शिवसेनेचं नव्हे, लोकशाहीचं भविष्य ठरवणारा"शिवसेनेचा धनुष्यबाण कुणी कधीच हिरावू शकत नाही. जेव्हा पक्षाचा एक आमदार असतो आणि तो जर पक्ष सोडून गेला तर पक्ष संपतो का? त्यामुळे १ आमदार असो, ५ असो किंवा मग ५० आमदार असतो. आमदार सोडून गेल्यानं पक्ष संपत नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. संपूर्ण देशाचं ११ जुलैच्या सुनावणीवर लक्ष लागून राहिलेलं आहे. माझ्यामते ११ जुलैची सुनावणी शिवसेनेचं नव्हे, तर लोकशाहीचं भविष्य ठरवणारी असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
धनुष्यबाण हिरावू शकत नाही"धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.