शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच महाराष्ट्रातील राजकारण बिघडले, विनोद तावडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:09 IST

महायुती सत्तेवर येण्याचा विश्वास

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारण फारच बिघडले आहे. २०१९ साली जनतेने भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना कौल न स्वीकारता उद्धव ठाकरे यांनी जनतेशी गद्दारी केली. त्यामुळेच हे वातावरण बिघडल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकाेडे उपस्थित होते.तावडे म्हणाले, व्यंगापासून ते प्राण्यांचा उल्लेख करत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, हे सर्वपक्षीयांनी थांबवायला हवे. मी विरोधी पक्षनेता होताे. परंतु सभागृहात खडाजंगी झाली तरी आम्ही सत्तारूढांसोबत जेवतही होताे. वैयक्तिक दुश्मनी नव्हती. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि मग वातावरण बिघडत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राममंदिराला विरोध करणाऱ्या कॉंग्रेससोबत गेल्याचे न पटल्याने एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांना आम्ही फक्त साथ दिली.

ते म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत झाली. त्यामध्ये काहीअंशी महायुतीला फटका बसला. परंतु विधानसभेला एमआयएम, वंचित, समाजवादी पक्ष, अपक्ष बंडखोर यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन अटळ आहे. हरयाणातील भाजपच्या विजयाने देशभरात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये आम्ही सहज सत्तेवर येऊ.

२०१४ ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच होताकेवळ बहुमतापेक्षा चारच आमदार जास्त असताना कोणतेही धाडसी निर्णय घेता येत नव्हते. त्यासाठी मजबूत सरकारची गरज असते. म्हणून अजित पवार यांची साथ स्वीकारली. परंतु चौकशीत समझोता केला नाही. परंतु २०१४ साली जेव्हा युती निवडून आल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकार बनवायला तयार नव्हते तेव्हा शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि आम्ही तो घेतला होता. त्यामुळे अजित पवार सोबत येणे यात वेगळे काही घडले नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरVinod Tawdeविनोद तावडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024