विनायक पात्रुडकर / मुंबईशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावला २६ जानेवारीच्या सभेत युती तोडल्याची घोषणा केली आणि त्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह उसळला. त्यावरून शिवसेना मुंबईत तरी प्रचंड यश मिळवेल, असे वातावरण तयार झाले होते. मुंबईत शिवसेनेने पहिला क्रमांक कायम राखला, तरी भाजपाच्या प्रचंड यशाची दुखरी किनार त्यांच्या यशाला आहे. शिवसेनेने युती तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय मुंबईतील जागावाटपाची चर्चा पूर्ण होण्याआधीच जाहीर केला. भाजपाने निम्म्या जागांची मागणी केली होती, पण ६०पेक्षा जास्त जागा देण्यास शिवसेना तयार नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील विसंवाद वाढत गेला. त्याची परिणती राज्यात एकमेकांविरुद्ध लढण्याच्या निर्णयात झाली, पण प्रतिष्ठा एकवटली गेली ती मुंबई महानगरपालिकेभोवती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या सभा घेऊन मुंबईतील वातावरण ढवळून काढले. शिवसेनेची भिस्त पारंपरिक मतदारांवर होतीच. अमराठी मतदारांनाही चुचकारण्याचे प्रयत्न शिवसेनेने केले. नोटाबंदीचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, ती निकालाने फोल ठरली. व्यापारी वर्ग आणि छोटे दुकानदार भाजपावर नाराज असल्याचे सांगण्यात येते होते. भाजपाला मिळालेले यश पाहता, या सर्व शक्यता खोट्या ठरल्या. संघटनात्मक बांधणीचा पाया ज्या मुंबईत शिवसेनेने रचला, त्याला प्रथमच भाजपाकडून आव्हान मिळाले आणि भाजपाला ते आव्हान पेलण्यात यशही मिळाले. शिवसेना आणि भाजपामधील अंतर पाहता, शिवसेनेच्या यशापेक्षा भाजपाने मिळविलेले यश अधिक ठळक आहे. महापालिकेत छोटा भाऊ म्हणून वावरणाऱ्या भाजपाने जुळ्या भावापर्यंत मजल मारली आहे. शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात मिळालेले हे आव्हान पुढच्या काळात त्रासदायक ठरणार यात शंका नाही.1युती न करण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला मर्यादित यश मिळाले आहे. यापुढे त्यांचा ठामपणा किती काळ टिकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.2प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच रंगल्या. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर सडेतोड टीका केली. या टीकांचा फायदा दोन्ही पक्षांना झाला.3संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली. त्यामुळे पुढील महापालिकेच्या राजकारणात सेनेप्रमाणे भाजपाचे वर्चस्व कायम राहणार आहे. सेनेचे आव्हान वाढलेसंपूर्ण राज्यात युती तुटल्याने या दोन्ही पक्षांची अधिक चर्चा घडून आली़ निवडणूक प्रचारदेखील या दोन्ही पक्षांच्या नेत्यांभोवती फिरला गेला. त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. मुंबई आणि ठाणे वगळता शिवसेनेला अन्य महापालिकांमध्ये उठावदार यश मिळविता आले नाही. प्रादेशिक पक्षाचा पर्याय म्हणून विचार करताना जनाधार वाढविणे, हे मोठे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. घोडेबाजार होणारमुंबईत सेनेला भाजपाशिवाय सत्ता स्थापन करायची आहे. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येते, हे येत्या काही दिवसांत कळेल. मुंबईत घोडेबाजार होणार हेही तितकेच खरे. मनसेला १० ठिकाणी यश मिळाले असले, तरी निकालाच्या पार्श्वभूमीवर या आकड्यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईवर निर्विवाद भगवा फडकविण्याचे स्वप्न मात्र यंदा अपूर्ण राहिले, हे उद्धव ठाकरे यांच्या जुगारातून स्पष्ट होते.दोन तरुण ठरले जायंट किलरमनोहर कुंभेजकर / मुंबईशिवसेनेच्या महापौरपदाचे दावेदार मानले जाणारे आणि मावळत्या महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांचा भाजपाच्या वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा भाचा योगीराज दाभाडकर यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला, तर १९९७ पासून ते २००६ पर्यंत शिवसेनानंतर आजमितीस नगरसेविका असलेल्या काँग्रेसच्या ज्योत्स्ना दिघे या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या. विशेष म्हणजे गेली ५ वर्षे त्या येथील काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका होत्या. प्रभाग क्र. ६८मध्ये भाजपाचे तरुण उमेदवार आणि अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड जायंट किलर ठरले. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनादेखील येथे धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 1अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींत अनेक अनपेक्षित निकाल लागले आहेत़ आरक्षणातून मार्ग काढत प्रसंगी पक्षांतर केल्यानंतरही अनेक दिग्गजांना आपल्या विजयाची घोडदौड कायम राखता आली नाही़ यामुळे मुंबई महापालिका २०१७च्या निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवक गारद झाले आहेत़ यामध्ये महापौरपदाच्या शर्यतीत असलेले स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचा पराभव धक्कादायक होता़ महिला आरक्षणात अनेकांचे प्रभाग राखीव झाले़ प्रभाग फेररचनेने बहुतेक नगरसेवकांच्या प्रभागांचे तुकडे झाले़ 2पाच वर्षे बांधलेले प्रभाग विखुरले गेल्याने काहींनी दुसऱ्या प्रभागांमध्ये उड्या घेतल्या़ काहींनी पक्षातून डावलले जाण्याची शक्यता असल्याने अन्य राजकीय पक्षांचा पर्याय स्वीकारला़ मात्र पक्षांतरानंतरही त्यांना विजयाची मोहर पुन्हा उमटविण्यात अपयश आले आहे़ 3देवेंद्र आंबेरकर, ज्योत्स्ना दिघे, यशोधर फणसे, तृष्णा विश्वासराव, शीतल म्हात्रे, विनोद शेलार, मनाली तुळसकर, सुषमा शेखर, अनुराधा पेडणेकर, नंदकुमार वैती, सुजाता पाठक, वकारुन्नीसा अन्सारी, अनिषा माजगावकर, वैष्णवी सरफरे, यामिनी जाधव, युगंधरा साळेकर, प्रवीण छेडा, मोहन मीठबावकर, प्रकाश दरेकर, ललिता यादव, बबलू पांचाळ, संतोष धुरी, रितू तावडे, भारती बावदाने ही पराभूत झालेल्या दिग्गज नगरसेवकांची नावे आहेत़ समाजवादीचे गटनेते विजयीसमाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी आपला गोवंडीतील प्रभाग सोडून थेट शहर भागातील प्रभागातून निवडणूक लढविली़ यातही ते विजयी ठरले.त्यामुळे त्यांचे गटनेते पद शाबूत राहिले़पक्षांतरानंतर ज्येष्ठ नगरसेविका पराभूतचारवेळा महापालिकेत निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या वकारुन्नीसा अन्सारी या दिग्गज नगरसेविका मानल्या जातात़ त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत एमआयएममध्ये प्रवेश केला़ २२३मधून त्यांनी निवडणूकही लढवली़ मात्र त्यांचा पराभव झाला़ भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मोहन मीठबावकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे़ विजयी नगरसेवकलढतींत काही नगरसेवक नशीबवान ठरले आहेत़ यामध्ये अपक्ष नगरसेवक भाजपात गेल्यानंतर निवडून आलेले मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीच्या सईदा खान, स्वपक्षीयांच्या तीव्र विरोधानंतर विजयी ठरलेल्या महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर, रमेश कोरगावकर, हेमांगी वरळीकर, सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या श्रद्धा जाधव, सुजाता पाटेकर, शुभदा गुडेकर, रमाकांत रहाटे, प्रियंका सावंत, शीतल म्हात्रे, भाजपाच्या शैलजा गिरकर, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या संध्या दोशी, मनसेचे दिलीप लांडे, मनसेतून शिवसेनेत गेलेले सुरेश आवळे, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, सागर ठाकूर, सहाव्यांदा निवडून आलेले डॉ़ राम बारोट, राजश्री शिरवाडकर, ज्योती अळवाणी, जया तिवाना, आसावरी पाटील, प्रवीण शाह, उज्ज्वला मोडक, बीना दोशी, काँग्रेसच्या सुनीता यादव, श्रीकला पिल्ले, सुषमा राय, संगीता हांडोरे, अश्रम आझमी, दिलशाद आझमी, अपक्ष उमेदवार चंगेझ मुल्तानी यांचा समावेश आहे़
( BMC ELECTION RESULT : मुंबईत पुन्हा ‘वूमन पॉवर’)
मनसेला धक्का : नगरसेवकांनी शिवसेनेचा मार्ग धरल्यामुळे आधीच मनसे अडचणीत आली होती़ विजय अपेक्षित असलेल्या काही प्रभागांमध्येही मनसेला धक्का बसला आहे़ खुल्या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या अनिषा माजगावकर, वैष्णवी सरफरे, दादरमध्ये शिवसेनेविरोधात उभे राहिलेले संतोष धुरी, सुजाता पाठक हे नगरसेवक पराभूत झाले़