शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

उद्धव ठाकरेंना नाक कुठे शिल्लक? - राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:14 AM

गेली तीन वर्षे सत्तेपुढे घासून-घासून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकच शिल्लक राहिले नसल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली.

कोल्हापूर/कणकवली : गेली तीन वर्षे सत्तेपुढे घासून-घासून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकच शिल्लक राहिले नसल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. राज्यातील सरकारबद्दल सामान्य जनतेत नाराजी असेल तर माझा पक्ष जनतेसोबत राहील, असेही त्यांनी सांगून टाकले.पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच राज्याच्या दौºयावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापुरातून सुरू झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपला पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.पक्षाशी पटत नसल्याने खासदार नाना पटोले यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘ठाकरे यांच्यात ती हिंमत नाही; कारण तसे केले तर त्यांचे दुकान बंद होईल. सत्तेत राहायचे आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची.आता केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरच ते टीका करायचे तेवढे राहिले आहेत. इतके नाराज आहातच तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवाल राणे यांनी केला.केवळ सिंधुदुर्गच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे, असा दावा करून राणे म्हणाले, सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षांत काय फरक राहिला? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर मी टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांवर कधी टीका केली नाही. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या सभेला प्रतिसाद मिळत आहे, त्यांची लोकप्रियता वाढत आहे, हे खरे असले तरी गुजरात विधानसभेच्या निकालापर्यंत धीर धरा. निकाल काय लागतो ते पाहू, असे राणे यांनी सांगितले़ राणे यांच्या टीकेला उद्धव काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़आता पक्षात घेऊन आमदार नितेश यांची कारकिर्द मी संपविणार नाही. अजून निवडणुकीस दोन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना माझी दोन्ही मुले माझ्या पक्षात सक्रिय होतील. भाजपासोबत जाताना ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश होईल; परंतु त्यासाठी काही अवधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राणेंच्या रक्तातच गद्दारीनारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. गेली २५ वर्षे नारायण राणे यांना आपण ओळखतो. त्यांच्या रक्तात गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील घटनांवरून दिसून येते. राणेंइतकी लाचारी दुसºया कोणत्याही नेत्यामध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘मंत्रिमंडळात दादागिरी केल्यानेच मराठा आरक्षण’कोल्हापूर : मराठा आरक्षण देताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक ९६ कुळी मराठा मंत्र्यांनी तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही. मात्र, दादागिरी करून मी हा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडले. याही पुढच्या काळात मराठा, धनगर आरक्षण देण्याची धमक केवळ या राणेमध्ये आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. ‘शिवसेनेला पुरून उरू,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदानात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या पहिल्याच जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. नव्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा हे तीन रंग आणि मध्यभागी वज्रमूठ आहे. माजी खासदार निलेश राणे यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, शिवसेनेत ३९ वर्षे काढली, काँग्रेसमध्ये १२ वर्षे काढली. दोन्हीकडे निष्ठेने काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे सांगितले ते ते जीवाची पर्वा न करता केले. त्यांना अजूनही दैवत मानतो. मात्र, माझ्याविरोधात उद्धवने कुभांड रचलेल्या १९ घटना मी बाळासाहेबांना लेखी दिल्या होत्या.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे