मुंबई - Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरे यांनी स्वत:चं मेटावर्स जग तयार केले आहे. त्या जगाचे राजे तेच आहेत, नियम आणि मूल्यही त्यांचेच आणि निर्णयही त्यांचेच आहेत असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना अधूनमधून उपरती होत असते. ते भ्रमात जगणारे व्यक्ती आहेत. जसं मेटावर्स असतं, तसं त्यांनी स्वत:चं मेटावर्स म्हणजे भ्रमजग तयार केलंय. त्या जगाचे राजेही तेच आहेत. त्या जगाचे नियम, मूल्ये त्यांचेच आहेत. निर्णयही त्यांचेच आहेत. अशा जगात जगणाऱ्या व्यक्तीने त्यांना अचानक भ्रम होतो देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंना तयार करून त्यांना मुख्यमंत्रिपद देणार होते. ६ वर्ष ते अमित शाह यांनी वचन दिले म्हणत होते. आता ते बदललं आणि देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असं बोलतायेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच खरे बोलायला विचार करावा लागत नाही. परंतु खोटे बोलायचे असेल तर एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलावं लागते. ते सर्व कधीतरी उघड पडते. ६ वर्षांनी आता ते बोलतायेत, त्यांना एकच उत्तर आहे की, माझे डोके ठिकाणावर आहे. कोण कुठे जाऊ शकतं हे कळतं. कोणाची कुठे जाण्याची क्षमता आहे. जेव्हा आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवायची होती, ही चर्चा त्यांच्याकडे सुरू असताना मी आदित्यला जरूर लढवा असं सांगितले होते. उद्या जर आदित्य ठाकरेंकडे तुमचा पक्ष द्यायला असेल तर निवडणुकीत तुमच्या पक्षाचे प्रमुख लढत असले तर लोकभावना वेगळी असते. सरकारच्या क्षमता आणि मर्यादा दोन्ही माहिती असते. तुम्ही निवडणूक लढला नाहीत पण त्याला लढवा या पलीकडे मी त्यांना काहीही म्हटलं नव्हते असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, सरकारमधलं काहीच माहिती नसणं, या गोष्टीचा परिणाम सरकार चालवण्यावर होतं, इतक्या विचित्र आयडिया डोक्यातून निघतात हे करून टाका, ते करून टाका, ते झालं पाहिजे असं नसते, सरकार म्हणजे काय, त्याच्या मर्यादा काय, अधिकार काय हे माहिती असले तर व्यक्ती लोकाभिमुख निर्णय घेऊ शकतो. प्रसिद्धीसाठी निर्णय घेत नाही असंही फडणवीसांनी म्हटलं.