शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:41 AM

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीपेक्षा तिप्पट खर्च

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर २.७९ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ठाकरेंसोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सोहळ्यावर नेमका किती खर्च झाला, याची आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनभट्टी यांनी मागितली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहा मंत्र्यांच्या शपथविधीवर २.७९ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती चनभट्टी यांना मिळाली. यापैकी तीन लाख रुपये फुलांच्या सजावटीवर खर्च झाले. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यावर ९८.३७ लाख रुपयांचा खर्च आला होता. वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला होता. चनभट्टी यांनी माहिती अधिकार अर्जातून गेल्या १० वर्षांत विविध सरकारी कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी मागितली होती. 

उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन ही नेते मंडळी उद्धव यांच्या शपथविधीला हजर होती.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस