ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - राज्य आणि केंद्रात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धाराशीव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवले.
धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का? असे सवाल उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारले आहेत.
सावकारीविरोधात नवे कायदे निर्माण होऊनही जे घडू नये ते घडतेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती धक्कादायक आहे. गेल्या सातेक महिन्यांत राज्यातील या भागात १ हजार ४०४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. हे आकडे नव्या राजवटीतील असतील तर जुन्या राजवटीपेक्षा नव्या सरदारांचे वेगळेपण ते काय? अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय आहेत अग्रलेखातील मुद्दे
- कर्ज, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि भरपाईच्या नावाने तोंडास पाने पुसणे हीच शेतकरी आत्महत्येची कारणे दोन वर्षांपूर्वी होती. आजही त्याच कारणांची पाने फडफडत आहेत व शेतकर्यांचे प्राण त्यामुळे तडफडत आहेत. भाटशिरपुरा येथील वनमालेची तडफड याच दुष्टचक्रामुळे होत होती. धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का?
- सावकारांना कोपरापासून फोडून काढण्याची गर्जना ‘माजी’ राज्यकर्त्यांनी केली होती. ती गर्जना हवेत विरली, पण खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार्या शेतकर्यांना नव्या राजवटीतही न्याय मिळेल काय, हा प्रश्नच आहे. हे प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक आहे.
- ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन केले व जीवनाची यात्रा संपवली. जमीन हडप करून सावकार पुन्हा पैशांचाही तगादा लावत असल्याचा आरोप वनमालेच्या नातेवाईकांनी केला. हे सत्य असेल तर नव्या राजवटीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सावकारीविरोधात नवे कायदे निर्माण होऊनही जे घडू नये ते घडतेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती धक्कादायक आहे. गेल्या सातेक महिन्यांत राज्यातील या भागात १ हजार ४०४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. हे आकडे नव्या राजवटीतील असतील तर जुन्या राजवटीपेक्षा नव्या सरदारांचे वेगळेपण ते काय? कर्ज, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि भरपाईच्या नावाने तोंडास पाने पुसणे हीच शेतकरी आत्महत्येची कारणे दोन वर्षांपूर्वी होती. आजही त्याच कारणांची पाने फडफडत आहेत व शेतकर्यांचे प्राण त्यामुळे तडफडत आहेत. ही तडफड सरकार आणि प्रशासनातील कारभार्यांना दिसत आहे का? दिसत असलीच तर ती थांबवावी असे त्यांना वाटत आहे का? राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे असे असंख्य प्रश्न आहेत. त्यांचे उत्तर नव्या राजवटीत अद्याप तरी मिळालेले नाही असेच भाटशिरपुरा येथील आत्महत्या प्रकरणावरून दिसते.
- कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र या पद्धतीने सुरूच आहे त्यात भाटशिरपुरा येथील वनमाला गायकवाड यांच्या आत्महत्येची आता भर पडली. मागील दोन दिवसांत जालना आणि नांदेड जिल्ह्यांतदेखील कर्ज परतफेडीच्या विवंचनेतून दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यांचे हे दुष्टचक्र थांबणार कधी? हे दुष्टचक्र थांबावे म्हणूनच राज्यातील जनतेने सत्तांतर घडविले. जुन्यांना सत्तेवरून घालवून नव्यांना सत्तापदी बसविले. मात्र तरीही शेतकर्यांच्या मानेभोवती असलेला सावकारी पाश आहे तसाच आहे. दुष्काळ, नापिकी आणि अवकाळी पावसाने होणारे नुकसान ही ‘अस्मानी’ असली तरी सावकारीच्या ‘सुलतानी’चे काय? त्याविरुद्ध सरकारचे कायदे, नियम असले तरी पळवाटांची ‘चलाखी’ वापरून सावकारीची सुलतानी सुरूच आहे. कर्तासवरता गमावलेली शेतकरी कुटुंबे या हलाखी आणि चलाखीच्या दुष्टचक्रात अडकून पडली आहेत. भाटशिरपुरा येथील वनमालेची तडफड याच दुष्टचक्रामुळे होत होती. राज्यातील हजारो कर्जबाजारी शेतकर्यांची आज वनमालाप्रमाणेच तडफड सुरू आहे. धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का?