शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

उजनी धरण १०० टक्के भरले

By admin | Published: October 01, 2016 11:48 PM

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे

- सिध्देश्वर शिंदे/ आॅनलाईन लोकमतसोलापूर, दि.01 - मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने यंदाच्या वर्षी १०० टक्केचा आकडा गाठला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास उजनी धरण १००. 45 % टक्के झाल्याने शेतकरी, साखर कारखानदार, राजकारणी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.उजनी धरण यावर्षी आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळीवर आले होते़ त्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस पडला नाही़ त्यामुळे यावर्षी उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येणार की नाही याबद्दल शंका निर्माण करण्यात येत होती़ कारण उजनी मायनस ५३.५३ पर्यंत खाली आले होते़ त्यातच जुन-जुलै या महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ६० दिवसात केवळ उजनीत ३२ टक्के पाणी आले़ आॅगस्ट उजडला तरी उजनी मायनस २८ टक्के एवढीच होती़ मात्र आॅगस्टमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने ६ दिवसात म्हणजे ६ आॅगस्टला उजनी धरणाने मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला़.मृत साठ्यातील ५३ टक्के पाणीसाठा भरून निघण्यास तब्बल ६६ दिवस पावसाळ्याचे गेले़ ६ आॅगस्ट ते १ आॅक्टोबर या ५५ दिवसात उजनी धरणाने दोन टप्प्यात कधी वेगाने तर कधी संथगतीने उजनी धरण १०० टक्के झाले आहे..उजनी धरण २८ वेळा गाठली शंभरीउजनी धरण यावर्षी उशिरा का होईना १०० टक्के झाले आहे़ उजनी धरणाने त्याच्या इतिहासात ३६ वर्षात २८ वेळा शंभर टक्के भरले आहे़ त्यात सर्वात उशिरा २००९ साली १०० टक्के भरले़ तेही केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसावर कारण २००९ साली १९ धरणातून एक थेंबही पाणी उजनी धरणात आले नव्हते.

उजनी धरणाची पाणीपातळीएकूण पाणीपातळी : ४९६.८१० मीटरएकूण पाणीसाठा : ३३१३.३० द़ल़घ़मीउपयुक्त साठा : १६१०़४९ द़ल़घ़मीटक्केवारी : 100. 45 टक्केविसर्ग : दौंड : ५०४६ तर बंडगार्डनमधून ३२८० ने पाणी येत आहे.उजनीत ५००० अन जाते ३३००उजनी धरण गेल्या चार पाच दिवसापूर्वी १०० टक्के होण्याची अपेक्षा होती़ परंतू दौड येथुन उजनीत येणाऱ्या विसर्गात कमालीची घट झाल्याने दररोज केवळ अर्धा, पाव टक्के पाणी वाढत गेले़ कारण दौंड येथुन उजनीत ५००० क्युसेसने विसर्ग येत होता अन ते आजही येत आहे़ उजनी कालव्याव्दारे १५०० क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे़ त्यामुळे येणारे ५००० क्सुसेक तर जाणारे ३३०० म्हणजेच केवळ १७०० क्सुसेकने उजनी वाढत आहे.१२१ दिवसात १६३ टक्के पाणी झाले जमायावर्षी उजनी धरणात १२१ दिवसात १६३ टक्के पाणी म्हणजे १२३़६३ टीएमसी पाणी जमा झाले आहे़ उजनी मायनस ५३़५३ टक्के प्लस १०० टक्के पाणी उजनी धरणातून कालवा, बोगदा यातून ८़५० टीएमसी पाणी सोडले होते असे एकूण १२१ दिवसात १२५़६३ टीएमसी अर्थात १६३ टक्के पाणी जमा झाले आहे़ चार महिन्यात उजनी दररोज १ टीएमसी पाणी जमा झाले आहे.उजनीतून भीमेत पाणी सोडण्याची शक्यता येणारउजनी धरणाची शंभरी पूर्ण झाली आहे़ त्यात पावसाने सुरूवात केल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के (१२३ टीएमसी) भरणार हे नक्की आहे़ त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.७ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवातउजनी धरणावरील १९ पैकी ४ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे़ वडज ८३२, घोड ३०००, कलमोडी ३२०, भामा आसखेड २१०० तर शनिवारी दिवसभर पुणे परिसरातील ८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. आंध्रा ५ मिमी, पवना ९ मिमी, कासारसाई ३० मीमी, मुळशी १३ मीमी, टेमघर २२ मीमी, वरसगांव १८ मीमी, पानशेत १५ मीमी एवढा पाऊस झाला आहे.