शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

उजनी धरणाने गाठली मायनस ३५.६६ टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:53 AM

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

ठळक मुद्देउजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहेउजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित

भीमानगर : उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यातच कृष्णा खोरे महामंडळाकडून पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र देऊन उजनी काठच्या भागातील पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

उजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १२६१.८२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा मायनस ५४०.९९ दलघमी, उजनीची टक्केवारी मायनस ३५.६६ टक्क्यांवर गेली आहे. एकूण टक्केवारी ४४.५६ तर उपयुक्त टक्केवारी १९.१० आहे.

गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी प्लस १४.९३ टक्के होती. यंदाच्या पातळीत बरीच घट दिसत आहे. अजून मे आणि जून हे दोन महिने पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने यंदा पाण्याचे संकट अधिक गडद होणार, असे जाणवत आहे.उजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भीमा नदीवरील एक आवर्तन द्यायचे शिल्लक आहे. ते येत्या १५ मे रोजी सोडण्यात येणार आहे. येणाºया काळात वेळेत पाऊस न झाल्यास जुलै २०१९ नंतर पाणी पिण्यासाठी ठेवण्याची खबरदारीही यंत्रणेला घ्यावी लागणार आहे. 

या सर्वांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यातील उजनी धरणाकाठी असलेले अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ