शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:21 PM

पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनीमध्ये आतापर्यंत ७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे

ठळक मुद्देएकीकडे उजनी धरण भरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात भीमानदीत नीरेचे पाणी येत आह़ेसोलापूर जिल्ह्यात फारसा पाऊस नसताना नदीला व धरणाला फायदा होतोयपुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

भीमानगर/अकलूज/पुणे : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनीमध्ये आतापर्यंत ७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वजा ५९.८८ वरून धरण प्लस २०.५०  टक्क्यांवर आले आहे. 

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे़ पुणे जिल्ह्यातील दौंडमधून बुधवारी दुपारी १२ वाजता ७० हजार क्युसेक तर बंडगार्डन येथून २८ हजार ४५६ क्युसेकने  विसर्ग उजनीत येत होता. सायंकाळी ६ वाजता बंडगार्डनमधून २१ हजार २७७ क्युसेक तर दौंडमधून ५७ हजार ३४२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे.

दरम्यान, नीरा नदीतील पाण्याने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. एकीकडे उजनी धरण भरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात भीमानदीत नीरेचे पाणी येत आह़े  त्यामुळे लवकरच ते औज बंधाºयात पोहोचणार आहे़ त्यामुळे दुग्धशर्करा योग आहे़ पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून सोलापूर जिल्ह्यात फारसा पाऊस नसताना नदीला व धरणाला फायदा होतोय़पुणे  जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला होता. तर, खडकवासला साखळीतील चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी (८१.८३ टक्के) पाणी जमा झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी मृत व ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश धरणात पावसाचा जोर कमी होता. वडज धरणातून २ हजार ३६६ क्युसेक वेगाने सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी १२२० क्युसेक पर्यंत खाली आणले. चासकमान भरण्याच्या मार्गावर असल्याने सायंकाळी ३६८५ क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत होते. खडकवासला धरणातून सकाळी ९,४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. 

बुधवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातील विसर्ग २,५६८ क्युसेकपर्यंत खाली आणला. वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने येथून सायंकाळी तब्बल २२ हजार ६८० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत होते. उजनीत मंगळवारी सकाळी उणे ०.९७ टीएमसी साठा होता. बुधवारी सकाळी आठपर्यंत उजनीत ४.०८ टीएमसी पाणीसाठा झाला. सायंकाळी साडेपाच पर्यंत त्यात ७.१६ टीएमसी पाणीसाठा झाला. 

खडकवासला साखळीत जोरदार पाऊसखडकवासला साखळीतील टेमघर धरणात बुधवारी सकाळी आठ पर्यंत ९०, वरसगाव ८०, पानशेत ७८ आणि खडकवासला येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर २०, वरसगाव ७० आणि पानशेतला ७७ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात १.९७, पानशेत ९.७१, वरसगाव ९.६९ आणि टेमघर धरणात २.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी पाणी (८१.८३ टक्के) जमा झाले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातPuneपुणेwater transportजलवाहतूकRainपाऊस