ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि.२० : यंदा उजनी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने धरणाच्या पाण्याखाली लपलेले जुने वाडे, मंदिर, मस्जिद, रस्ते, पूल उघडे पडल्याने त्याचे दर्शन घडत आहे. कुगाव (ता. करमाळा) येथील ऐतिहासिक इनामदारांचा भव्य-दिव्य वाडा पाण्याबाहेर आल्याने त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.भीमा नदी अडवून १९७६ ला उजनी धरण बांधले गेले. करमाळा तालुक्यातील २७ गावे धरणाच्या पाण्याखाली बुडाली. त्या सर्व गावांचे अन्यत्र स्थलांतर होऊन पुनर्वसन झाले खरे. पण ती गावे इमारतीसह जशीच्या तशी पाण्याखाली बुडाली. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने करमाळा तालुक्यातील कुगाव येथील धरणात बुडालेला इनामदारांचा वाडा गढीसह पाण्याबाहेर पडल्याने या वाड्याची भव्यदिव्यता लक्षात येत आहे. हे पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक कुगावकडे येत आहेत. वाड्याच्या सभोवती थोडे पाणी अद्यापही असल्याने होडीद्वारे या वाड्यात पर्यटक वाडा पाहणीसाठी जात आहेत. गेली ४० वर्षे हा वाडा पाण्यात राहूनही त्या वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत. इनामदार सध्या पुण्यात!च्करमाळा तालुक्यातील कुगाव हे पश्चिम भागात जेऊरमार्गे चिखलठाणपासून अवघ्या चार कि. मी.अंतरावर भीमा नदीच्या काठावर आहे. कुगाव येथे पूर्वी इनामदार यांची जहाँगिरी होती. आजही इनामदारांची शेती-वाडी,घरे असून ते पुणे येथे वास्तव्यास आहेत, असे आदिनाथचे माजी संचालक व कुगावचे रहिवासी धुळाभाऊ कोकरे यांनी सांगितले.
उजनीतील वाड्याचे दर्शन!
By admin | Published: May 20, 2016 10:34 PM