- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथे झालेल्या मोहसिन शेख खून खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने रद्द केली. सोमवारी न्यायालयात सरकारच्या वतीने कोणीही सरकारी वकील उपस्थित न झाल्याने दोषारोप निश्चितीचे काम ४ जुलै रोजी विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर होणार आहे. सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम यांनी लेखी अर्ज देऊन म्हटले की या खटल्यातून मी निवृत्त होत आहे. मुस्लिमांच्या दुकानाची तोडफोड केली व हिंदू राष्ट्र सेनेची दहशत राहावी म्हणून आरोपींनी कटकारस्थान केले म्हणून न्यायालयाने सर्व आरोपींवर भादंवि १४३, १४७ १४८, ३०७, ३०२, १२० (ब) अन्वये दोषारोप निश्चित करण्यात यावेत असा दोषारोप निश्चितीचा ९ पानी अर्ज पूर्वीच उज्ज्वल निकम यांनी दाखल केला आहे. या खटल्यात हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (वय ३४ रा. हिंदुगड मुळशी) व इतर २० आरोपी कारागृहात आहेत.