लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या जवळ जाणे कुणालाही सहज शक्य नव्हते. कारण त्यांना नेहमी आक्रमक भूमिका घेणारे लोकजवळची वाटत असत. वारकरी संप्रदायाचे पुजारी असलेले उल्हास पवार मात्र त्यांना शांतपणे अध्यात्मिक पद्धतीने जगण्याचे तत्वज्ञान समजून सांगत असत. यामुळे प्रभावित होऊन त्यांना महाराष़्ट्राचे मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत संजय गांधी होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केला.सुरेश भट गझल मंच आणि उल्हासदादा मित्र परिवाराच्या वतीने उल्हास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गझलरंग या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी आमदार मोहन जोशी, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते. उल्हास म्हणजे काँग्रेसचा ‘एनसायक्लोपीडिया’च आहे. चाळ पायात व टाळ हातात, लावणी ते वारी अशा विविध क्षेत्रात मुक्त संचार करणाºया या माणसाला कधीच कुठला रंग लागला नाही, असे शिंदे म्हणाले.
...उल्हास पवारांना ते मुख्यमंत्री करणार होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:27 AM