जळगाव : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी.पाटील खून खटल्यात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी. एन. पाटील यांनाही आरोपी करण्यात यावे, असा आदेश जळगावचे अतिरिक्त सत्र न्या. डी. जे. शेगोकार यांनी दिला. प्रा. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांनी दिलेल्या दीर्घकालीन न्यायालयातील लढय़ालाही या निर्णयाने यश आले आहे. तसेच सव्वाआठ वर्षापासून प्रलंबित खटल्याच्या कामकाजाला गती मिळेल. पुढील सुनावणी 1क् जुलैला होईल.
राजकीय वैमनस्यापोटी कट रचून 21 सप्टेंबर 2क्क्5 रोजी सकाळी जळगावमधील मानराज पार्कसमोर प्रा. पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन.पाटील यांचे पत्ते व वय याबाबतचा तपशील मूळ फिर्यादी प्रा. रजनी पाटील यांनी न्यायालयाला सादर करायचा आहे.
आधीच्या चारपैकी एक आरोपी राजू माळी कारागृहात असताना मरण पावला. दुसरा आरोपी राजू सोनवणो कारागृहात आहे. दामोदर लोखंडे व लिलाधर नारखेडे हे अन्य दोन आरोपी आहेत. (प्रतिनिधी)