उल्हासनगर काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 05:08 PM2021-05-30T17:08:13+5:302021-05-30T17:10:27+5:30
केंद्रातील भाजप सरकार विरोधात शहर काँग्रेसने काळा दिवस पाळून आंदोलन केले. यावेळी भाजप केंद्र शासनाच्या सत्ताकाळातील सात पुतळे उभारून देश अधोगतीकडे गेल्याचे सांगून घोषणाबाजी केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : केंद्रातील भाजप सरकार विरोधात शहर काँग्रेसने काळा दिवस पाळून आंदोलन केले. यावेळी भाजप केंद्र शासनाच्या सत्ताकाळातील सात पुतळे उभारून देश अधोगतीकडे गेल्याचे सांगून घोषणाबाजी केली.
केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्ष झाले असून भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. केंद्र सरकारच्या निषेर्धात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने रविवार हा काळा दिवस पाळला.
कॅम्प नं-५ येथील कुर्ला कँम्प चौकात सात वर्षाच्या सत्ता काळातील सात पुतळे बनवून आंदोलण करण्यात आले. आंदोलनात प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे, किशोर धडके, शंकर आहुजा, सुनिल बहरानी, सुजाता शास्त्री, महेश मिरानी, दिपक सोनोने, रोहीत ओव्हाळ, मनोहर मनूजा, अनिल सिन्हा, नारायण गेमनानी, मनिषा महांकाळे, विजया गाढे, ज्योती लबाना, पुष्पा शिंदे, सुधा जोगळेकर, सुरज वसिटा, विशाल सोनवणे, पवन मिरानी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार निषेध करून घोषणाबाजी केली.