शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

उल्हासनगर विकास आघाडीतून रिपाइं बाहेर?

By admin | Published: January 31, 2017 3:16 AM

रिपाइंच्या काही जागांवर ओमी टीमने हक्क सांगितल्याने उल्हासनगर विकास आघाडीतून (यूडीए) बाहेर पडण्याचा इशारा आठवले गटाने दिला. ओमी टीमच्या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच

- सदानंद नाईक, उल्हासनगररिपाइंच्या काही जागांवर ओमी टीमने हक्क सांगितल्याने उल्हासनगर विकास आघाडीतून (यूडीए) बाहेर पडण्याचा इशारा आठवले गटाने दिला. ओमी टीमच्या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच भाजपा आणि रिपाइंत जागावाटप होऊन त्यांना १२ जागा सोडण्यात आल्या होत्या. ओमी टीम भाजपासोबत आल्यावर या जागावाटपाला नख लागणार, हे गृहीत होते. तसे झाल्याने ओमींच्या आक्रमक भूमिकेमुळे यूडीएतील वाद चव्हाट्यावर आला आहे. रिपाइंनी दुसरा पर्याय शोधण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी भाजपावर विश्वासघाताचा आरोप केला आहे आणि शिवशक्ती-भीमशक्तीची हाक देत शिवसेनेसोबत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे.भाजपा आणि ओमी टीमच्या समझोत्यात दोघांचेही विद्यमान नगरसेवक सोडून इतर जागा निम्म्यानिम्म्या वाटून घेण्याचा निर्णय झाला. त्यात ओमी टीमने रिपाइंच्या १२ जागांपैकी काही जागांवर हक्क सांगितला. या जागा वाटल्याचे सांगूनही ओमी टीम ऐकत नसल्याने रिपाइं आठवले गटाचे कार्येकर्ते संतप्त झाले. ज्या प्रभाग ७ मधील चारपैकी तीन जागा रिपाइंना सोडल्या आहेत, त्याच प्रभागात ओमी टीमने प्रचार सुरू केला आहे. त्याचा जाब शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह शहराध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारला. पण, विकास आघाडी तुटेल, या भीतीने भाजपा नेत्यांनी त्याची कल्पना ओमी टीमला दिली नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी वाजतगाजत बनलेल्या विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे.