अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 01:16 PM2023-07-03T13:16:02+5:302023-07-03T13:17:50+5:30

Jitendra Awhad on Ajit Pawar Mla's नरेंद्र मोदी हे तुमचे नेते आहेत, यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे फोटो बॅनरवर छापा. मला कोणी माहिती नाही प्रतोद कोण आहे आणि कोण काय आहे फरक पडत नाही. - जितेंद्र आव्हाड

Ultimatum to NCP MLAs who went with Ajit Pawar till July 5? Jitendra Awhad clarified there 'enmity' with Sharad Pawar | अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

googlenewsNext

अजित पवारांसोबत सरकारमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ५ जुलैपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे का, या प्रश्नावर नवे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी मला याची माहिती नाही असे सांगितले. परंतू, ५ जुलैला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे, तेव्हा कळेल असे ते म्हणाले. 

शरद पवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सातारा, कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते. अजित पवारांसोबत गेलेले आमदार सोशल मीडियावर हे पाहत असतील. त्यांच्या मनात आता धास्ती असेल जेव्हा उद्या शरद पवार त्यांच्या मतदारसंघात जातील आणि सभा घेतील तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. यामुळे हे आमदार उद्याच्या ५ तारखेपर्यंत पुन्हा परततील असे आव्हाड म्हणाले. 

आम्ही व्हीप दिला आहे. नऊ जणांना डिस्कॉलिफिकेशन नोटीस देण्यात आली आहे. जशीजशी त्यांच्या हालचाली होतील तशी पुढे कारवाई होईल. आमदारा आमच्याशी चांगलेच वागत आहेत. एकाने सांगितलेय की माझ्याकडे कागदपत्रे दिली गेली, मलाच माहिती नव्हती त्यात काय आहे. मी सही केली, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

नरेंद्र मोदी हे तुमचे नेते आहेत, यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे फोटो बॅनरवर छापा. मला कोणी माहिती नाही प्रतोद कोण आहे आणि कोण काय आहे फरक पडत नाही. मी पवार साहेबांसोबत आहे. विरोधी पक्षनेता संख्याबळावर ठरविला जातो. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे, उद्या काय होईल ते माहिती नाही, असे आव्हाड म्हणाले. 

आजपासून नवीन लढाई सुरू, आम्ही जेही करू ते कायदेशीर रित्या करू. आम्हाला माहिती आहे आमच्याबरोबर कोण कोण आहे, आम्हाला काही बोलायचं नाही.  शरद पवार आता रस्त्यावर आलेले आहेत, जमलेली गर्दी बघून आमदारांना याची कल्पना आली असेल. आणि आमदार पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांना आपला वैरी बनवू इच्छित नाहीत, असे आव्हाड म्हणाले. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Ultimatum to NCP MLAs who went with Ajit Pawar till July 5? Jitendra Awhad clarified there 'enmity' with Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.