लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय जलसंपदा व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांच्या घरीदेखील त्या गेल्या. गुरुपौर्णिमा जवळ येत असून हे दोघेही मला गुरुस्थानी आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले होते. सरसंघचालकांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांचा इस्रायल दौरा हा खरोखरच ऐतिहासिक म्हणावा लागेल. रालोआच्या काळातच इस्रायलमध्ये यात्रेवरून प्रतिबंध हटविण्यात आले होते. मोदींचा हा दौरा या दृष्टीने बराच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत झाले, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपती निवडणुकांविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मीरा कुमार यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही त्या म्हणाल्या.
उमा भारतींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: July 06, 2017 4:13 AM