पुणो : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यपदासाठी आज (बुधवारी) बिनविरोध निवडणुका झाल्या. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, सासवड , जेजुरी येथे सत्ता राखण्यात सत्ताधा:यांना यश आले. आळंदीत मात्र पहिल्यांदाच नगराध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात आले. जेजुरी, सासवड, दौंड व शिरूर नगरपालिकेवर महिला नगराध्यक्ष झाल्या.
ब्रिटिश काळात 1869 मध्ये स्थापन झालेल्या आळंदी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच आळंदी नगर परिषदेवर शिवसेनेच्या रोहिदास कुंडलिक तापकीर नगराध्यक्ष झाले. तर नगर परिषदेच्या 145 वर्षाच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध महिला उपाध्यक्ष होण्याचा मान अंजना वसंत कु:हाडे यांना मिळाला.
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी, तर उपनगराध्यक्षपदी गणोश आगलावे यांची आज एकमताने निवड झाली. पालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ही दोन्ही पदे याच पक्षाकडे राहिली आहेत. हे दोन्ही पदाधिकारी प्रभाग क्र. 3 मधील असल्याने या प्रभागात मोठा जल्लोष करण्यात आला. पालिकेसमोर कार्यकत्र्यानी भंडा:याची उधळण करून नूतन पदाधिका:यांचे अभिनंदन केले. सासवड नगर परिषदेच्या अध्यक्षपदी आनंदीकाकी जगताप, तर उपनगराध्यक्षपदी सुहास लांडगे यांची बिनविरोध निवड झाली.
दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अंकुशाबाई शिंदे, तर उपनगराध्यक्षपदी योगेश कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सुनीता वीरेंद्र कालेवार यांच्या बिनविरोध निवडीची आज घोषणा करण्यात आली. उपनगराध्यपदी प्रकाश रसिकलाल धारिवाल यांचीही बिनविरोध निवड झाली. मिळालेल्या संधीचे सोने करून नगरीच्या विकासात भर टाकण्याचा विश्वास कालेवार त्यांनी व्यक्त केला.
इंदापूरच्या नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे यांची, तर उपनगराध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे. यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी तीन मतांच्या फरकाने इंदापूरच्या नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता अबाधित राखली.
बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुभाष चंपालाल सोमाणी यांची तर उपनगराध्यक्षपदी रेश्मा शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. (प्रतिनिधी)