शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

अनधिकृत धार्मिक स्थळे लपवली

By admin | Published: April 26, 2016 4:20 AM

सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे.

धीरज परब,

मीरा रोड- सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे. पालिकेच्या यादीतून सुविधा भूखंडांवरील (आरजी) अनधिकृत धार्मिक स्थळांना सोयीस्करपणे वगळले असून बिल्डरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक बेकायदा धार्मिक स्थळांची नावे आणि क्षेत्रफळ याचा तपशील व्यवस्थित गोळा केला नाही.राज्य शासनाच्या २००१ मधील एका आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे उभारू नये. शिवाय, खाजगी जागेत धार्मिक स्थळ उभारण्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. पालिका, पोलीस व महसूल विभागाने स्थानिक स्तरावर नियमांचे काटेकोर पालन न केल्याने शहरातील रस्ते, पदपथ, आरक्षणे, सार्वजनिक जागा, सीआरझेड आदी ठिकाणी सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळे उभी राहिली आहेत. २००६ साली ‘पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील’ यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याबद्दल २०१० साली सोसायटी फॉर जस्टीस व इतर संस्था यांनी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका दाखल केली. २०११ साली राज्य शासनाने सार्वजनिक व शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी आदेश जारी केले. मीरा-भार्इंदर महापालिकेने शासन आदेशानंतर शहरातील ७८ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रभाग समितीनिहाय तयार केली. त्यामध्ये पालिकेने केवळ ‘अ’ व ‘ब’, अशी दोनच वर्गवारी केली आहे. ‘अ’ वर्गातील म्हणजेच नियमित करण्याजोगी ३४ तर ‘ब’ म्हणजेच अनधिकृत तथा हटवण्यायोग्य अशा ४४ धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली होती. अनधिकृत धार्मिक स्थळे सात दिवसांत हटवा, अशा नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. पण, नेहमीप्रमाणेच त्या कुचकामी ठरल्या. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने शासन यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी करीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्याचे आदेश दिले होते. भाजपा-शिवसेना युती शासनाने त्यानुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये नवीन आदेश काढत २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची निष्कासित करण्याजोगी धार्मिक स्थळे दोन वर्षांत तोडावी, असे आदेश दिले. स्थलांतरित होऊ शकणारी धार्मिक स्थळे ६ ते ९ महिन्यांत स्थलांतरित करावीत तसेच नियमित करण्याजोगी धार्मिक स्थळे ६ महिन्यांत नियमित करून घ्यावी, असे स्पष्ट कळवले आहे. तर, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सर्वच धार्मिक स्थळे नऊ महिन्यांत तोडण्याचे आदेशदेखील राज्य शासनाने दिले. परंतु, मीरा-भार्इंदर महापालिकेने न्यायालय व शासन आदेशाला हरताळ फासून पूर्वी जाहीर केलेली अनधिकृत धार्मिक स्थळांची जुनी यादीच ६ एप्रिल रोजी जाहीर केली आहे. ‘ब’ वर्गातील ४४ पैकी ५ धार्मिक स्थळे पालिकेने तोडल्याचा दावा केला, तर १७ धार्मिक स्थळे एमएमआरडीएच्या हद्दीत गेल्याने ‘ब’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या आता २२ इतकीच राहिली आहे. ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या मात्र ३४ इतकी कायम आहे. परंतु, नव्याने यादी जाहीर करताना पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केलेच नाही. असंख्य धार्मिक स्थळांचा यादीत समावेशच नाही. इतकेच नव्हे तर यादीत जाहीर केलेल्या धार्मिक स्थळांचे क्षेत्रफळदेखील तद्दन खोटे नमूद केले आहे. अनेक धार्मिक स्थळांबद्दल लोकांनी तक्र ारी करूनदेखील पालिका व पोलीस प्रशासनाने केवळ वेळकाढूपणाच केला,जेणेकरून धार्मिक वाद चिघळत ठेवण्याचे काम या यंत्रणांनी केले. सुविधा भूखंडांमध्ये (आरजी) मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली असताना पालिकेच्या यादीत मात्र एकाही आरजी भूखंडावर अनधिकृत धार्मिक स्थळाचा साधा उल्लेखही नाही. आरजीच्या जागा गृहसंकुलात सदनिका खरेदी करणाऱ्या रहिवाशांच्या करमणुकीकरिता वापरात आणणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील शांतीनगर, शांती पार्क, शीतलनगर, जांगीड कॉम्प्लेक्स, तिरु पती-बालाजी कॉम्प्लेक्स, पद्मावती गोल्डन नेस्ट आदी लहानमोठ्या वसाहतींमध्ये सर्रास आरजी व मोकळ्या जागांत बिल्डरांच्या कृपेने अनधिकृत धार्मिक स्थळे न्यायालय व शासन आदेशाला वाकुल्या दाखवत उभी आहेत.