मुंबई : रेल्वेची ई-तिकिटे अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या दलालांची रेल्वे सुरक्षा दलाकडून धरपकड करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या विविध विभागांतर्गत केलेल्या कारवाईत २0१६ च्या एप्रिल महिन्यापर्यंत ३६२ केसेसची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ४२३ दलालांना अटक करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. त्यामध्येही आतापर्यंत २३१ दलालांवर कारवाई झालेली आहे. पश्चिम रेल्वे विभागात १९८ जणांना पकडण्यात आले असून दक्षिण रेल्वे विभागात ५७ तर दक्षिण मध्य रेल्वे विभागात ५४ जणांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वे विभागात २६ जणांना पकडले. पूर्व मध्य रेल्वे आणि उत्तर पूर्व रेल्वेत कारवाईचे प्रमाण हे कमी आहे. पश्चिम रेल्वेने १६ जून ते २९ जूनपर्यंत केलेल्या कारवाईत ४९ केसेसमध्ये ५१ दलालांना अटक केली आहे व १२ लाख ७६ हजार रुपये किमतीची तिकिटे हस्तगत करण्यात यश आले आहे. (प्रतिनिधी)
ई-तिकिटांच्या अनधिकृत विक्रीला चाप
By admin | Published: July 01, 2016 4:29 AM