मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याला चाप लावण्यासाठी दंडात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, वाहन चालकांना दुप्पट ते दहापट दंडाची आकारणी केली जाईल. दुचाकीस्वार विनाहेल्मेट असल्यास ५00 रुपये दंड, तर बेदरकारपणे वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंडाची आकारणी केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत तरुणांमध्ये रेसिंगचे प्रमाण अधिक असून, त्याला जरब बसावी, यासाठी तब्बल दोन हजार रुपये दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई शहर व उपनगरात वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना दिसते. वर्षाला जवळपास १५ ते २५ लाखांदरम्यान वाहतूक नियमन उल्लंघनाच्या केसस होतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून चालकांना दंड ठोठावतानाच जनजागृती मोहीमही हाती घेतली जाते. तरीही पुन्हा जैसे थे परिस्थती होते. यात खासकरून सर्वाधिक विनाहेल्मेट, बेदरकारपणे वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल तोडणे, रेसिंग, नो पार्किंगच्या गुन्ह्यांचा समावेश असतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन थांबावे आणि चालकांना जरब बसावी, यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी १६ आॅगस्टपासून केली जात आहे. विनाहेल्मेट असल्यास दुचाकीस्वाराला या पूर्वी १०० रुपये दंड आकारला जात होता. आता हाच दंड ५०० रुपये करण्यात आला आहे. अनेक वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास येते. हे नियमबाह्य असल्याने त्या विरोधात वाहन चालकाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल. या पूर्वी हाच दंड १०० रुपये होता. वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याने, तसेच रेसिंगमुळे बऱ्याच अपघातांना तोंड द्यावे लागते. त्याला आळा बसावा, वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाला प्रत्येकी एक हजार रुपये (पान १२ वर)
बेशिस्त चालकांना दुप्पट ते दहापट दंड
By admin | Published: August 16, 2016 5:26 AM