मुंबई - वेतनवाढीच्या कराराबाबतचे गैरसमज दूर झाल्याने गेले दोन दिवस सुरू असलेला एसटी कामगारांचा अघोषित संप शनिवारी रात्री अधिकृतपणे मागे घेण्यात आला. सुरुवातीला प्रशासनासोबतच्या वाटाघाटी फिसकटल्या होत्या. मात्र रात्री उशिरा संघटना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यात पुन्हा चर्चा झाली. संप मिटल्याने प्रवाशांचे हाल संपले आहेत. वेतनवाढीचा तिढा सोडवण्याऐवजी प्रशासनाने संपकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत निलंबनाची कारवाई सुरू केल्याने व वेतनकपातीचा इशारा दिल्याने शनिवारी संप अधिक तीव्र करण्यात आला होता.रावते यांनी वेतनवाढ करारासंदर्भात झालेले गैरसमज करून न घेता कर्मचाºयांनी ती आधी समजून घ्यावी व ४,८४९ कोटींची ऐतिहासिक वेतनवाढ स्वीकारावी, असे सांगत कर्मचाºयांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासह मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे उपस्थित होते.बसचालकाचा मृत्यू९ जून रोजी कामावरून आलेले हिंगोली आगारातील चालक भास्कर प्रल्हाद अवचार (४५, जि. वाशिम) नातेवाईकांकडे जात असताना त्यांची प्रकृती बिघडली. जिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सलग ३६ तासांच्या कामाच्या तणावातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे.बैठकीत काय ठरले?एसटीची वेतनवाढ करारात परावर्तीत करण्यासाठी प्रशासन व संघटनेत लवकरच बैठक एसटीसाठी घरभाड्याचे टप्पे ७-१४-२१ असे ठरलेले आहेत. पण राज्य सरकारी कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगात ते ८-१६-२४ असे करण्यात आले तर ते एसटी कर्मचाºयांनाही लागू करणारएसटीची वार्षिक वेतनवाढ दोन टक्के इतकी आहे. राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगात कर्मचाºयांना वाढ तीन टक्क्यांनी दिली तर तशीच वाढ एसटी कर्मचाºयांना मिळणार
एसटीचा अघोषित संप अखेर मिटला, वेतनवाढीबाबत गैरसमज दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:14 AM