शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारीला बळ

By admin | Published: June 04, 2016 3:21 AM

मालेगाव स्फोट, गुजरात दंगल आणि हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरणातील गुन्हेगारांना क्लीन चिट देण्यासाठी, त्यांच्यावरील गुन्हे कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकार शासकीय यंत्रणेचा वापर करीत आहे

सांगली : मालेगाव स्फोट, गुजरात दंगल आणि हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरणातील गुन्हेगारांना क्लीन चिट देण्यासाठी, त्यांच्यावरील गुन्हे कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकार शासकीय यंत्रणेचा वापर करीत आहे. मोदी सरकारचा हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारीला बळ देण्याचा हा प्रकार देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या नेत्या वृंदा करात यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. करात म्हणाल्या की, मालेगाव स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेशी निगडित दोन आरोपींना शासकीय यंत्रणेनेच दोषी ठरविल्यानेच त्यांना अटक केली होती; परंतु केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर लगेच शासकीय यंत्रणेने त्यांना सोडले. गुजरात दंगलीच्या प्रकरणाचेही तसेच झाले. हैदराबाद विद्यापीठातील हुशार दलित तरुण रोहित वेमुला याचा शासकीय यंत्रणेच्या दबावामुळे बळी गेला. तेथेही तत्काळ शासकीय यंत्रणेने दोषींना निर्दोष ठरवले. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरीही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे शासकीय यंत्रणाच सांगत आहे. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत, यालाही राजकीय दबाव कारणीभूत आहे. (प्रतिनिधी)

खडसेंवर कारवाई का नाही?स्वच्छ, निष्कलंक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची जाहिरातबाजी मोदी करीत आहेत. महाराष्ट्रातील महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा स्वत:चाच महसूल वाढत आहे, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे मोदींना दिसली नाहीत का? ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तर दुष्काळात सेल्फी काढतात. हे कसे त्यांना चालते? - वृंदा करात

शेतकऱ्यांचे दु:ख मोदींपर्यंत कधी पोहोचणार?‘‘महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असून कुपोषणही वाढले आहे. महागाई वाढली असून तरुणांच्या हाताला रोजगार नाही. दुष्काळात शेतकरी, जनता होरपळत आहे. या व्यथा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत का? त्यांनी आत्महत्याग्रस्त भागामध्ये एकही दौरा केला नाही. उलट दिल्लीत नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेऊन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे.’’