शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

साखरेचे दर तीन हजारांच्या आत, कारखानदारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:15 AM

घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. यामुळे साखर कारखानदारांची चिंता वाढली असून दर वाढण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पावले उचलली नाहीत, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.यंदा उसाचे उत्पादन चांगले असल्याने देशात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. साखरेची मागणीही जवळपास २५० लाख टन आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा कमी म्हणजे २०३ लाख टन इतके झाले होते. परिणामी, गेल्यावर्षी साखरेचे घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल चार हजारांपर्यंत, तर किरकोळ बाजारातील दर ४५०० रुपयांवर गेले होते. त्यावेळी सरकारने हस्तक्षेप करून दरवाढ रोखली.हे दर सरासरी प्रति क्विंटल ३६०० आणि किरकोळ बाजारातील प्रति किलो ४० ते ४२ रुपयांच्यादरम्यान राहतील, याची दक्षताघेतली होती.साखरेचा शिल्लक साठा आणि चालू हंगामातील अपेक्षित उत्पादन लक्षात घेता यंदा दर आॅक्टोबरपासूनच घसरू लागले. ही घसरण ३५०० वरून २९५० रुपयांपर्यंत झाली आहे. ती १५ टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे कारखान्यांना एफआरपी अधिक २०० रुपये हा दर देणे अवघड बनले आहे. घसरण अशीच चालू राहिली, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी साखरेचे किरकोळ बाजारातील दर ४० ते ४२ रुपयांच्या वर जाऊ नयेत, यासाठी केंद्राने उपाय योजले होते. तशीच उपाययोजना आता दर घसरू नयेत, यासाठीही सरकारने केली पाहिजे. अन्यथा, साखर कारखानदारीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल.- विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ.