कोरोना साथीच्या काळात नव विवाहित दाम्पत्यापासून ते इतर सर्वच जोडप्यांना लैंगिक संबंध ठेवण्याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. एका अभ्यासात विर्यामध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याचे आढळून आले पण विर्यातून मात्र लैंगिक संबंधानंतर कोरोनाचा प्रसार होत नाही, असे सिद्ध झाले. कोरोनाबाधित स्त्रियांमध्ये योनीतील स्वॅबमध्ये मात्र कोरोनाचे विषाणू आढळून आले नाही. असे असले तरी कोरोनाग्रस्त व्यक्ती व संपर्कात असल्यास पुढील मार्गदर्शक तत्वे सांगता येतील. च् विर्यातून संसर्ग होत नसला तरी लैंगिक संबंधात जवळचा संपर्क येत असल्याने निदान झाल्यापासून १४ दिवस व शक्य असल्यास महिना भर शारीरिक संबंध टाळावे.
च् निदान होण्याच्या आठवडाभर आधी जर इतर कोणाशी लैंगिक संबंध ठेवले असतील तर ती व्यक्ती ही हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे जोखीम जास्त असलेली व जवळून संपर्क आलेली व्यक्ती ठरते. अशा व्यक्तीने चौदा दिवस स्वत:ला क्वारंटाइन करावे व पुढील १४ दिवस, म्हणजे निदान झाल्यापासून शक्य असल्यास महिनाभर लैंगिक संबंध टाळावे.च् कोरोनाबाधित व्यक्तीशी थेट संपर्कात आलेल्यांनी लैंगिक संबंध १४ दिवस टाळावे.च् नवविवाहित दाम्पत्यांसाठी वधू किंवा वरापैकी कोणीही हॉट स्पॉट असलेल्या शहरातून आलेले असल्यास किंवा कंटेन्मेंट झोनमधून आले असल्यास १४ दिवस संयम ठेवावा.च् साथीच्या काळात देहविक्रय करणाऱ्यांशी लैंगिक संबंध किंवा पूर्वइतिहास किंवा कुठली ही माहिती नसलेल्याशी लैंगिक संबंध हे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढवणारे ठरू शकते.च् कोरोनामुळे लैंगिक क्षमतेवर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असा गैरसमज व अफवा पसरली आहे, हा गैरसमज आहे.च् साथीच्या काळात व जास्त वेळ घरात राहावे लागते अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये संतती नियमनाच्या साधनांकडे दुर्लक्ष होते व अशा संकटांनंतर अनियोजित गर्भधारणेचे प्रमाण वाढते म्हणून या काळात संतती नियमनाकडे विशेष लक्ष असू द्यावे.- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)