शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

इंग्रजीतील तंत्रभाषा समजण्यासाठी...

By admin | Published: April 08, 2017 11:55 PM

पुण्या-मुंबईत मुलांना इंग्रजी माध्यमातले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण समजत नसल्याने काही हजाराच्या संख्येने पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी

- अ. पां. देशपांडे पुण्या-मुंबईत मुलांना इंग्रजी माध्यमातले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण समजत नसल्याने काही हजाराच्या संख्येने पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. गेल्या २५-३० वर्षांत आपण समाजात एक चुकीचा संदेश पाठवला आहे. त्याला आपण सगळे जण समाज म्हणून जबाबदार आहोत. तो असा की, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी माध्यमात मुलांना घातले पाहिजे. हे जर खरे असेल तर मला सांगा, की डॉ. अनिल काकोडकर आणि प्रा. जयंत नारळीकर हिंदी माध्यमातच शिकले ना? डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. ज्येष्ठराज जोशी, डॉ. विजय भटकर, विजय तेंडुलकर, नाना पाटेकर हे मराठी माध्यमातच शिकले ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती माध्यमात, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व कानडी माध्यमातच शिकले ना? पडले का ते जगाच्या स्पर्धेत मागे? तुम्ही दहावीपर्यंत प्रादेशिक भाषेत शिका आणि मग इंग्रजी माध्यम घ्या. तरीही भारतभरच्या सगळ्या ग्रामीण भागांत अकरावीत महाविद्यालयात आलेल्या मुलांना एकदम इंग्रजी माध्यम पेलवत नाही. त्यासाठी प्राध्यापकांना प्रादेशिक भाषांतून विषय समजावून द्यावे लागतात. पण प्राचार्य शिक्षकांना धमकावतात, की त्यांना इंग्रजीतूनच शिकवा. आज जड जाईल, पण उद्या समजेल. मग या बिचाऱ्या शिक्षकांना खास मुलांच्या आग्रहाखातर प्रादेशिक भाषांतून शिकवावे लागते. रिक्षावाला- टॅक्सीवाल्याशी, दुकानदाराशी आपण हिंदीत नाहीतर इंग्रजीत बोलतो. व्यापारात मराठी बोलले पाहिजे. एक उत्तर भारतीय रिक्षावाला म्हणाला, हम मराठी बोलनेकी कोशिश जरूर करेंगे, लेकीन आप लोगही हमसे हिंदीमे बात करते है! यहा मराठी का माहोल नही है.मला १९६० सालचा एक प्रसंग आठवतो. ठाण्याला मराठी साहित्य संमेलन भरले होते. समीक्षक प्रा. रा.श्री. जोग संमेलनाध्यक्ष होते. संमेलनापूर्वी २ महिने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. पहिल्या रात्री सध्या ठाण्याच्या क्लॉक टॉवरपाशी जी भाजी मंडई आहे तेथे त्या वेळी मैदान होते व त्यावर रात्री ९ वाजता, ‘संयुक्त महाराष्ट्राचे स्वगत आणि स्वागत’ हा परिसंवाद होता. त्यात त्या वेळचे बेळगावचे आमदार बा.रं. सुंठणकर म्हणाले, ‘मी ज्या ज्या वेळी कर्नाटकाच्या विधानसभेत बेळगाव महाराष्ट्रात घाला अशी मागणी करतो, तेव्हा तेव्हा आमचे मुख्यमंत्री बी.डी. जत्ती सांगतात, तुमच्या मराठी साहित्यिकांनी आम्हाला लिहून दिले आहे, की बेळगाव कर्नाटकातच राहू दे. आज आता या परिसंवादाचे अध्यक्ष दत्तो वामन पोतदार यांना मी विचारू इच्छितो, की हे काय आहे?’ आणि मग जेव्हा दत्तो वामन पोतदार बोलायला उभे राहिले, तेव्हा श्रोते त्यांना बोलू देईनात. मग पोतदार रागावले. म्हणाले, ‘ज्या कागदावर ते लिहून दिले तो कागद माझ्या फायलीला आहे, त्यांना कशाला मागता? १९४६ साली बेळगावला शिवराम परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात भौगोलिक प्रांतरचनेचा मुद्दा होता. त्याला अनुलक्षून आम्ही लोक म्हणालो, बेळगाव कर्नाटकात घाला. त्यावर माझी सही आहे. पण, आज तुमचा मुद्दा आहे, भाषिक प्रांत रचनेचा आणि मला तुम्ही मराठी भाषेचा अभिमान शिकवता? मराठीचे विद्यापीठ व्हावे, म्हणून आम्ही खस्ता खाऊन पुणे विद्यापीठाची स्थापना केली. १९१० साली इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून आम्ही जुने कागदपत्र जमा केले. तुम्ही चहाचे दुकान टाकता आणि त्याला ‘अमृततुल्य टी हाउस’ म्हणता. हा तुमचा मराठीचा अभिमान? तुम्ही केस भादरायचे दुकान काढता आणि त्याला ‘हेअर कटिंग सलून’ म्हणता. हा तुमचा मराठीचा अभिमान? आणि असे त्यांनी सट्ट्यावर सट्टे मारले आणि सभा ताब्यात घेतली. जे श्रोते त्यांची हुर्रे करीत होते, त्यांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय आहेत. रोज आपण मराठी काही वाचतो का? दरमहा एकतरी मराठी पुस्तक विकत घेतो का? मुलाबाळांना मराठीत बोला असा आग्रह धरतो का? दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम पाहतो का? आपल्या दारावरची पाटी मराठीत आहे का? मराठी नाटके आणि चित्रपट पाहतो का? बोलण्यात सहजी येणारे इंग्रजी शब्द टाळतो का? महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परभाषक मित्राशी मराठीत बोलतो का? उपाहारगृहात पदार्थांची मागणी मराठीत करतो का? मराठीत सही करतो का? मराठीत काही लिखाण करतो का? असे अनेक उपाय आता करायला हवेत.