शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

दहा लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Published: April 08, 2017 11:28 PM

अन्य देशांप्रमाणे भारतातही महामार्ग हे लहान-मोठ्या शहरांमधून जातात. केवळ रेस्टॉरंट आणि बारच नव्हे, तर हॉटेल, मॉल, सिनेमागृहे, क्लब आणि निवासी गाळेही महामार्गालगत

- दिलीप दातवानीअन्य देशांप्रमाणे भारतातही महामार्ग हे लहान-मोठ्या शहरांमधून जातात. केवळ रेस्टॉरंट आणि बारच नव्हे, तर हॉटेल, मॉल, सिनेमागृहे, क्लब आणि निवासी गाळेही महामार्गालगत अस्ताव्यस्त पसरलेले असतात. उद्योगांसाठी फिरणारे, तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेण्याचा तारांकित हॉटेलांचा प्रयत्न असतो. या बंदीने मुंबईत अनेक नामांकीत हॉटेलांसह पन्नासहून अधिक हॉटेलना फटका बसण्याची शक्यता आहे.या दारूबंदीचा फटका केवळ पर्यटन व्यवसायालाच मोठ्या प्रमाणावर बसेल, असे नसून भारत हा पर्यटकांसाठी अशा सुविधा न देणारा देश अशी प्रतिमा जगभरातील पर्यटकांसमोर उभी राहील. भारतातील हॉटेल उद्योग हा जगात सर्वाधिक कर देणारा उद्योग आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर धरून एकूण सुमारे ३८ टक्के कर या उद्योगाकडून भरला जातो. जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये हेच प्रमाण अवघे ५ ते ७ टक्के आहे. मुंबईत परमिट रूमसाठी वार्षिक परवाना शुल्क ६ लाख तर बीअर शॉपसाठी दीड लाख रुपये आहे. त्यामुळे या निर्णयामुळे सरकारच्या महसुलावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारला कर, अबकारी कर आणि परवाना शुल्क धरून ७ हजार कोटी गमवावे लागतील, तर देशभरातील हा आकडा २ लाख कोटींच्या घरात जाईल. याशिवाय १० लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल ते वेगळेच. या बंदीचा परिणाम सरकारला दाखवण्यासाठी असोसिएशनने नुकतीच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांची भेट घेऊन, त्यांना या निर्णयाच्या परिणामांबद्दल माहिती दिली.

(लेखक हे फेडरेशन आॅल हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आहेत)