- अपर्णा वेलणकरकेंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच ‘सॉफ्ट पॉवर’नामक ‘आधुनिक शस्त्रा’चा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांनी शबल अर्थसत्ता होत असलेला भारत एका नव्या पर्वात पाऊल टाकत असल्याची ग्वाहीच जणू दिली!आपली भाषा-संस्कृती-कला-लोकजीवन- प्रथापरंपरा- प्राचीन ज्ञान, संस्कृतीचा ठेवा, देशोदेशी पसरलेली मूळ ‘आपल्या’ वंशाची माणसे या साऱ्याचा शक्तिशाली समुच्चय म्हणजे ‘सॉफ्ट पॉवर’! त्या शक्तीचा नियोजनबद्ध वापर करून जगाच्या राजकारणात आपले वर्चस्व निर्माण करणारे समांतर मार्ग आखण्याचे धूर्त शास्त्र आकारालाआणले ते अमेरिका, जर्मनी यासारख्या देशांनी! आधुनिक काळात हा मान चीनकडेही जातो.भारताचे योगशास्त्र, आयुर्वेद, इथले संगीत, पाकसंस्कृती वा ‘बॉलीवूड’ याकडे ‘संपत्ती’ वा ‘सत्ता’ म्हणून पाहण्याचे ना येथल्या राजकीय नेतृत्वाला सुचले, ना लेखक-कलावंतांनी त्याकरिता काही हातपाय हलवले.‘सॉफ्ट पॉवर’नामक या अस्त्राकडे पहिले पाऊल टाकले ते नरेंद्र मोदींनी! भारताच्या योगासनांना थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये नेऊन त्यांनी शंभराहून अधिक देशांना ‘इंटरनॅशनल योगा डे’मध्ये ओढून आणले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रथमच आपल्या काही संकल्पित योजना ‘सॉफ्ट पॉवर’च्या खात्यात टाकल्या आहेत.शेजारी नेपाळच्या प्राथमिक शाळांमध्ये मँडरीन भाषा शिकण्याची ‘स्वेच्छा’ (सक्ती) सुरू झाली असून, ती शिकवणाºया शिक्षकांचा पगार आपल्या खिशातून देण्याचे ‘औदार्य’ चीनने दाखविले आहे. जर्मनी, जपानसारखे देश तरुण भारतीय मनुष्यबळाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतात मोठी ‘गुंतवणूक’ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात ‘सॉफ्ट पॉवर’चे निदान खाते उघडले जाणे महत्त्वाचे आहे ते म्हणूनच!‘योगा डे’नंतरची ‘सॉफ्ट’ पावले- भारतीय पासपोर्टधारक अनिवासी देशात येताच तत्काळ आधार कार्ड, १६0 दिवसांच्या प्रतीक्षा काळाची अट रद्द- आफ्रिकेमध्ये भारताच्या परराष्ट्र विभागाची १८ संपर्क कार्यालये- २0१९-२0मध्ये चार नवे भारतीय दूतावास- देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १७ पर्यटनस्थळांचा विकास- भारतातील आदिवासी जमातींचे पारंपरिक संगीत, नृत्ये,संस्कृती-संदर्भांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल संग्रहालय’ची निर्मिती
Union Budget 2019: ‘सॉफ्ट पॉवर’चे खाते अर्थसंकल्पात उघडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 2:25 AM