शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

"पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 6:11 AM

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विजयी संकल्प मेळाव्यात शाह बोलत हाेते.

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून आमच्यासोबत यांनी विधानसभेची निवडणूक लढवली; परंतु निकाल लागल्यानंतर काहींच्या तोंडाला पाणी सुटले आणि मी मुख्यमंत्री होणार म्हणून शरद पवार यांच्या पायाशी गेले. आता वेळ बदलली आणि पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली. त्यांना एकप्रकारे अद्दल घडवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विजयी संकल्प मेळाव्यात शाह बोलत हाेते. शाह म्हणाले, समृद्ध भारताचा पाया घालण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्याची गरज आहे. यावेळी लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागा जिंकून शिवसेना-भाजपचे महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करा. आम्ही सत्तेसाठी लालसी नाही. आमचे आमदार जादा असतानाही एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री केले. आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही, तर महाराष्ट्राचे हित सर्वतोपरी आहे. भारतीय जनता जे प्रश्न सुटावेत म्हणून ७० वर्षे आस लावून बसली होती ते प्रश्न मोदींनी पाच वर्षांत सोडवले. शरद पवारांसह मित्रपक्षांचे सरकार असताना देशात १२ लाख कोटींचे घोटाळे झाले, असा आरोप त्यांनी केला.

तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला : उद्धव ठाकरे केंद्रीय निवडणूक आयोगाने सरळसरळ अन्याय केला असून, चोरालाच घराचा मालक बनविण्याचा हा प्रकार आहे. याला केंद्रीय गृहमंत्री ‘दूध का दूध, पानी का पानी’ म्हणत आहेत. अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यायचा आहे. तुम्ही तर दुधात मिठाचा खडा टाकला आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी अमित शाह यांना दिले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा