शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

भारताविरोधात ‘युनियन जिहाद’

By admin | Published: February 10, 2016 4:36 AM

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या सर्व अतिरेकी संघटना भारताविरुद्ध एकत्र काम करतात. ‘युनियन जिहाद कौन्सिल’ म्हणून या संघटना पाकिस्तानमधून

मुंबई : लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या सर्व अतिरेकी संघटना भारताविरुद्ध एकत्र काम करतात. ‘युनियन जिहाद कौन्सिल’ म्हणून या संघटना पाकिस्तानमधून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करतात. या सर्व संघटनांच्या म्होरक्यांचे आयएसआयच्या बड्या अधिकाऱ्यांशी संबंध असून पाकिस्तानातील काही निवृत्त लष्करी अधिकारीच या संघटनेचे मुख्य असल्याची साक्ष लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. जी.एस. सानप यांच्यासमोर दिली.मेजर पाशा आणि मेजर इक्बाल यांचे एलईटीशी घनिष्ठ संबंध आहेत. हेडलीने भारतीय सैन्यातील गुप्तहेर गळाला लावून पाकिस्तानी व्यक्तीला भारतीय सैन्यात भरती करावे. जेणेकरून भारतीय सैन्याच्या सर्व हालचालींवर पाकिस्तानची नजर राहील, असा एलईटी आणि आयएसआयचा कट होता. याचबरोबर हेडलीने तो आयएसआयसाठीही काम करत असल्याची धक्कादायक कबुली मंगळवारी न्यायालयासमोर दिली. 2007 मध्ये सिद्धिविनायक मंदिराची बारकाव्याने रेकी केली होती. साजिद मीरने तशी सूचना केली होती. मीरच्या सूचनेनुसार, हेडलीने २००७ मध्ये सिद्धिविनायक मंदिराची बारकाईने टेहळणी केली. मंदिर आणि संपूर्ण परिसर त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता. त्याशिवाय कुलाबा येथील राज्याचे पोलीस मुख्यालय, नेव्हल एअर स्टेशनही एलईटीच्या रडारवर होते. मात्र काही कारणास्तव ही ठिकाणे ‘टार्गेट’च्या यादीतून वगळण्यात आली. मात्र मुंबईलाच का ‘टार्गेट’ करण्यात आले, याची माहिती नसल्याचे हेडलीने अ‍ॅड. निकम यांना सांगितले.मी कॅफे लिओपोल्डशिवाय संपूर्ण भगतसिंह मार्गाची रेकी केली होती. या मार्गावर असलेल्या सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले होते. तसेच अरबी समुद्राजवळची अनेक ठिकाणेसुद्धा जीपीएसमध्ये स्टोअर केली. पाकमध्ये परत गेल्यावर हे सर्व फोटो आणि व्हिडीओ साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांच्या हातात दिले. मुझफ्फराबाद येथे साजिद मीर, अबू काफा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला मुंबईतील ताजमहल हॉटेलची रेकी करण्याचे काम सोपवण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मी माझे काम पूर्ण केले होते. मी काढलेले फोटो आणि व्हिडीओ मी त्यांना दाखवले. त्यांनी त्याबाबत मला प्रश्न विचारले. आम्ही ताजच्या एन्ट्रन्स, एक्झिट आणि ताजच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलबाबत चर्चा केली.हल्ल्यास ेसंपूर्ण एलईटी जबाबदार मुंबईवरील हल्ल्याचा आदेश कोणाचा होता, अशी विचारणा अ‍ॅड. निकम यांनी हेडलीकडे केली असता त्याने या हल्ल्यासाठी कोणी एक व्यक्ती जबाबदार नसून संपूर्ण एलईटी जबाबदार असल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘हाफीज सईद एलईटीचा मुख्य असल्याने त्यानेच झकी- उर-रहमान लख्वीला आॅपरेशनल कमांडर म्हणून नेमल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे त्यानेच मुंबईवर हल्ला करण्याचा आदेश दिला असावा, असे मला वाटते. त्याच्याच आदेशावरून हे सगळे घडत होते,’ असेही हेडलीने न्यायालयाला सांगितले.भारतीय सुरक्षा वैज्ञानिक होते एलईटीचे ‘लक्ष्य’ हेडलीने त्याची पत्नी फैझासह ताज हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉन्वेन्शन हॉलची बारकाईने रेकी केली होती. २००७ मध्ये याच हॉलमध्ये भारतीय सुरक्षा वैज्ञानिकांची परिषद होती. या परिषदेच्या वेळी अतिरेकी हल्ला करण्याचा एलईटीचा कट होता. मात्र अपुरी शस्त्रास्त्रे, कमी मनुष्यबळ आणि परिषदेच्या बैठकीची वेळ आणि तारीख न कळल्याने एलईटीचा हा कटही बारगळला. २००७ पूर्वीच हेडलीने मुंबईतील बऱ्याच ठिकाणांची रेकी केली होती. त्यात कॅफे लिओपोल्ड आणि शहीद भगतसिंह पथावरील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचा समावेश होता. मात्र या सर्व कामांसाठी एलईटी आणि आयएसआयने पैसे दिल्याचा आरोप हेडलीने साफ नाकारला. हेडलीने दिलेली साक्षएलईटीवर अमेरिकन सरकारने बंदी घातली आहे. या बंदीविरोधात न्यायालयात जाण्याची सूचना मी झकी-उर-रहमान लख्वी आणि हाफीज सईद यांना केली होती. हाफीज साहेबांना ही कल्पना चांगली वाटली. मात्र त्यासाठी आयएसआयशी चर्चा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.मेजर अली यांनी माझी ओळख मेजर इक्बाल यांना करून दिली. कारण त्यांना माझा वापर भारताविरुद्ध करायचा होता. मात्र त्या वेळी त्यांनी मला याबद्दल काहीच सांगितले नाही.मी मेजर इक्बाल यांना लाहोरला भेटलो तेव्हा त्यांच्याबरोबर एक व्यक्ती होती. ही व्यक्ती पाकिस्तान लष्करात कर्नल म्हणून काम करत असल्याचे मला सांगण्यात आले. मला या कामासंबंधी विचारणा करण्यात आली आणि मीही तयारी दर्शवली. मेजर अब्दुल रहमान पाशा, हे पाकिस्तानच्या सिक्स्थ बलोच या रेजिमेंटमधून निवृत्त झाले होते. तेही एलईटीचा कारभार सांभाळायचे अल-कायदा या संघटनेवर अमेरिका व पाकिस्तान या दोन्ही सरकारने बंदी घातली होती. माझी ओळख झाल्यानंतर दोन-अडीच वर्षांनी पाशा अल-कायदामध्ये रुजू झाले. ही माहिती त्यांनी स्वत:च मला दिली.झकी-उर-रहमान लख्वी आॅपरेशन्स कमांडर होता. त्याची नियुक्ती एलईटीचा मुख्य हाफीज सईद साहेब यांनी केली असावी, असा माझा अंदाज आहे. आॅपरेशन कमांडर असल्याने मुंबईवर हल्ला करण्याचा कटही त्यांचाच असावा, असे मला वाटते. मला याविषयी काही माहीत नाही. मौलाना अझर मसूद यांना मी ओळखत नाही. त्यांना मी केवळ पाहिले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ते मुख्य आहेत. एकदा एलईटीच्या एका कार्यक्रमात त्यांना भाषण देण्यासाठी बोलावण्यात आले. आध्यात्मिक आणि भारताविरुद्ध त्यांनी भाषण केले.मसूद आता कदाचित नजरकैदेत असावेत. आता मला नक्की माहीत नाही. २००६ मध्येही झालेल्या बैठकीत मला मुंबईला जा, असे सांगण्यात आले. त्या वेळी मला टार्गेटविषयी काहीही सांगण्यात आले नव्हते. फक्त भारतात जाऊन व्यवसाय सुरू कर, असेच सांगण्यात आले. एलईटीमध्ये दाखल झाल्यानंतर मी १४ सप्टेंबर २००६ रोजी पहिल्यांदा मुंबईत आलो. मुंबईचा बशीर शेख मला विनानतळावर घ्यायला आला. त्यानेच माझी हॉटेल आऊट्रममध्ये राहण्याची सोय केली. मुंबईत व्यवसाय सुरू करून मुंबईची रेकी करण्याच्या उद्देशाने मी मुंबईत २००६ मध्ये आलो. हॉटेल आऊट्रम सोडल्यानंतर मी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळील श्याम निवास येथे राहणाऱ्या मीरा कृपलानी यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिलो. यासाठी जीपीएसचा वापर केला. त्यानंतर जीपीएस साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांना दिले. काफा आणि मीरने हे जीपीएस दिले होते. एप्रिल २००७ ला मी फैझाबरोबर ताज हॉटेलमध्ये आलो. ताजच्या दुसऱ्या मजल्याची रेकी करण्याचा आदेश साजिद मीरने दिला होता. ताजबरोबरच रेल्वे स्टेशन, वर्ल्ड ट्रेड सेंटर व लँडिंग साइटचे अनेक फोटो मी घेतले. तसेच व्हिडीओ चित्रित केले.