शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Politics: “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का नाही झाली?”; नारायण राणेंचा रोकडा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 20:18 IST

उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत औद्योगिक प्रगती करायला, या शब्दांत नारायण राणेंनी पलटवार केला.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेत शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्यागिक क्रांती का नाही झाली, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे. 

विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केलेय? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवले. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का नाही झाली?

सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला, या शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेचा रोखठोक शब्दांत समाचार घेतला.

शिंदे आणि सामंत दोघेही मंत्रिमंडळात होते 

फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे. यानंतर काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. तसेच ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे अयोग्य आहे. कारण, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत तत्कालीन मंत्रिमंडळात होते. मंत्री होते, असे सांगत शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Foxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलNarayan Raneनारायण राणे Sharad Pawarशरद पवार