सिंधुदुर्ग : जनआशीर्वाद यात्रा कणकवलीत दाखल झाली आहे. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत आगळे वेगळे असे लक्षवेधी स्वागत नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केलं.ढोल ताश्याचा गजर अन फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषी स्वागत करण्यात आले.यावेळी सिंधुगर्जना ढोल पथकाचा लक्षवेधी अविष्कार ठरला.
यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,माजी मंत्री रवींद्र चव्हाण,आ.नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे, नीलम ताई राणेजिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,यात्रा प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष समीर नलावडे,अतुल काळसेकर,संध्या तेरसे,सुरेश सावंत,मिलींद मेस्त्री, महेश सावंत,नगरसेवक अभिजित मुसळे,राजश्री धुमाळे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, कणकवली नगरपंचायत नगरसेवक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह…
कणकवलीत मंत्री राणे येणार असल्याने सायंकाळी ८ वाजल्यापासून पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.मोठ्या संख्येने गर्दी त्यात ढोल पथकाची साथ ,आनंदाने कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता.भारतीय जनता पक्षाचे झेंडे डोलाने फिरवत कार्यकर्ते अमाप उत्साह साजरा करत होते. हा उत्साह रात्री उशिरापर्यंत तसाच होता.अखेर केंद्रीय मंत्री राणेंचे आगमन झाले आहे.