शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; गडकरींचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:36 PM

गेल्या काही दिवसांपासून गडकरी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत

सांगली: आगामी निवडणुकीनंतर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र तेव्हापासून गडकरींची काही वादग्रस्त विधानं चर्चेत आहेत. कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव करणाऱ्या गडकरींनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले.शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केलं. 'टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपा सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,' असं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यात गडकरींनी रखडलेल्या सिंचन योजनांवर भाष्य केलं. टेंभू सिंचन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. टेंभूसारख्या अनेक योजना पूर्णत्वास जात नव्हत्या. या योजना कधी पूर्ण होतील, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. मात्र केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार असताना अनेक योजना मार्गी लागल्या. त्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली, असं गडकरींनी सांगितलं. याआधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याबद्दल कळवळा दाखवल्यानं गडकरींवर टीका झाली होती. मल्ल्यानं अनेक वर्षे नियमितपणे बँकांचं कर्ज फेडलं. मात्र व्यवसायात अडचणी आल्यानं त्याला हफ्ते भरता आले नाहीत. मग त्याला कर्जबुडव्या म्हणायचं का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पSangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस