“भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही, पण शरद पवार जर...”; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:34 PM2023-04-29T16:34:09+5:302023-04-29T16:35:30+5:30

Maharashtra Politics: आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, एकनाथ शिंदे चांगले काम करत असल्याने दुसऱ्यांना संधी नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.

union minister ramdas athawale reaction over ncp ajit pawar and sharad pawar | “भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही, पण शरद पवार जर...”; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

“भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही, पण शरद पवार जर...”; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदावरून पाठिंबा दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मुख्यमंत्री पदावरून दोन गट पडल्याची चर्चा राजकारणात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही. पण शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशी ऑफर देण्यात आली आहे. 

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत पुनरुच्चार केला आहे. यापूर्वीही रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी भाजपसोबत येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवण्यासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आम्हाला भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही. सध्या अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चढा-ओढ सुरू आहे. आम्हाला शरद पवार यांनी राजकारण शिकवले आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी लोकांनी एनडीएमध्ये यावे. जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांच्यासारखे विविध विचारसरणीचे लोकही एनडीएमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे पवार साहेबांनी या प्रस्तावावर विचार करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. 

मी एनडीएमध्ये आलो आहे, तर शरद पवार यांनी यायला हरकत नाही

मी एनडीएमध्ये आलो आहे, तर पवार साहेबांनी यायला हरकत नाही. आता शरद पवार यांनी ठोसपणे निर्णय घ्यावा, त्यांचाबरोबर कोणी यावे हे, असे सांगण्यापेक्षा शरद पवार यांनी आमच्या सोबत यावे, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, कुणाकडे बहुमत असेल तरच हे शक्य आहे. याबाबत चर्चाही खूप होत आहे. मला सांगायचे आहे की, मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे, असे आठवले यांनी सांगितले. परंतु एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना संधी नसल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: union minister ramdas athawale reaction over ncp ajit pawar and sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.