शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केळी खोडापासून धागा निर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

By admin | Published: February 16, 2017 8:40 AM

केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत /वासुदेव सरोदे

जळगाव, दि. 16 - केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न तर मिळतेच शिवाय ५५० जणांना रोजगारही मिळाला आहे. राज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.

राज्यात एकूण ७१ हजार ०७२ हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात ४४ हजार ३०२ हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे ४ हजार ४४४ खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी ६०-८० टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात, यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो.

शेतकऱ्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या प्रकल्पाची किंमत- ६९४.०५ लाख रुपये इतकी आहे. शासनाने राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत २४७.४२ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग १११.९९ लाख रुपये व संस्थेचा सहभाग ३३४.६४ लाख रुपये इतका आहे. हा प्रकल्प नवसारी कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे.

एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे २० किलो असते. यात २-३ किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम धागा व १५ ते १६ किलो भाग हा टाकावू असतो. यात ७ ते ८ लीटर पाणी असते. ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने यावल तालुक्यात चार ठिकाणी अर्थात मस्कावद, सातोद, दहिगाव व यावल येथे केळीपासून धागानिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

यानंतर बोदवड, वरणगाव, खानापूर, हंबर्डी, चिनावल व वाघोड अशा सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सहा केंद्रे यशस्वी झाली तर आणखी १० प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण व जागृती-केळी उत्पादक तसेच या लघु उद्योग केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

खोडाच्या पाण्यापासून उत्पादने केळी खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. हे द्रवरूप खत ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात राज्यात या द्रवरूप खताची मागणी असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.केळी खोडापासून अशी होते धागानिर्मिती ४शेतकरी बांधवांसाठी पथदर्शी असलेला टाकावू केळी खोडापासून धागा व खत निर्मितीचा प्रकल्प सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात पूर्वी शेतकऱ्यांकडून फेकले जाणारे खोड आता ५०० रुपये टनाप्रमाणे खरेदी केले जाते. हे केळी खोड प्रकल्पात आणून खोडातील मधोमध असलेला नाजूक भाग वेगळा करण्यात येतो. त्यानंतर खोडाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात व एक-एक पाकळी मशीनमध्ये टाकून धागा निर्मिती केली जाते. या प्रक्रि येतील टाकावू वस्तू गोळा होते त्याला प्रेसमध्ये त्यातील पाणी वेगळे केले जाते. या पाण्यापासून सेंद्रीय द्रवरुप खतनिर्मिती होते व राहिलेल्या टाकावू भागापासून पुन्हा गांडूळ व कम्पोस्ट खत तयार करण्यात येते. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे व व्हा.चेअरमन डॉ.आर.एम.चौधरी यांनी दिली. केळी खोडाच्या पाण्यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिब्रालिक अ‍ॅसिड या सारखे पीक वाढ प्रवर्तक असते. केळी खोडाचे पाणी पिकाला दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते व रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते. सद्य स्थितीला केळी खोडाचे धागे विक्री करण्यात येत आहेत. आतापर्यंत १ हजार ४४५ किलो धाग्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता केळी खोडाच्या धाग्यांपासून हात कागद व बोर्ड निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षी करण्याचा मानस या ताप्ती एनर्जी संस्थेचा आहे.