शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुस्लीम महिलांचे अनोखे रक्षाबंधन : एकात्मतेला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 7:25 PM

शहरात सोमवारी जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले.

ठळक मुद्देमुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्यासर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळालेरक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण म्हणून हिंदू संस्कृतीत ओळखला जातो देवळालीच्या तोफखाना केंद्रात महिलांनी जवानांना राख्या बांधल्या

नाशिक : भारत हा विविधतेने नटलेला व विविध जाती-धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशात सर्व नागरिक एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरे करतात. याचा प्रत्यत शहरात सोमवारी (दि.७) आला. जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण म्हणून हिंदू संस्कृतीत ओळखला जातो. बहीण भावाला ओवाळून राखी बांधत आपले बंधूप्रेम व्यक्त करते. जवान, पोलीस हेदेखील समाजाचे व देशाचे रक्षण करतात. त्यामुळे जुने नाशिकमधील प्रभाग क्रमांक १४च्या नगरसेविका व माजी पूर्व प्रभाग सभापती समीना मेमन, सॅव्ही वुमेन महाविद्यालयाच्या संचालक श्रुती भुतडा यांच्या संक ल्पनेनुसार मुस्लीम-हिंदू महिलांनी एकत्र येत त्यांच्यासोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला.

दरम्यान, सकाळी देवळालीच्या तोफखाना केंद्रात जाऊन या महिलांनी जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राख्या बांधल्या. यावेळी मुस्लीम महिलांनी पारंपरिक बुरखा व स्कार्फ परिधान केला होता. दुपारी महिलांनी पोलीस आयुक्तालयालाही भेट देऊन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त डॉ. लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राखी बांधली. यावेळी रहनुमा उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक शिरिन शेख, मोहसिना पठाण, शाहीन शेख, शकीला शेख, सलमा शेख, सीमा खान आदि महिलांसह ‘सॅव्ही’च्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.