शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी!

By राजकुमार जोंधळे | Published: August 11, 2022 11:32 PM

Raksha Bandhan: बहिणीने  कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.

- राजकुमार जोंधळेलातूर - बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा... दरवर्षी श्रावणातील राखी पौर्णिमेला आपल्या लाडक्या भावाची बहीण आतुरतेने वाट पाहते. अशाच बहिणीने  कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.

कोल्हापूर आगारात कर्तव्यावर असलेले चालक लक्ष्मण मधूकर डावरे (वय 35) हे मूळचे चाकूर तालुक्यातील चपोली येथील रहिवासी आहेत. राखी पोर्णिमेनिमित्त पुण्याहून  बहिण शामल नागनाथ शिंदे (रा. सुगाव ता. चाकूर) ही माहेरी चपोली येथे आलेली होती. कोल्हापूर येथे चालक असलेल्या भावाला तीने गावाकडे रक्षाबंधन सणासाठी येण्याची विनवणी केली.भावाचीही  गावाकडे येण्याची तीव्र इच्छा होती मात्र, सुट्टी मिळाली नाही. याबाबत भावाने बहिणीला सांगितले, मला गावाकडे येणे जमणार नाही. यावर नाराज झालेल्या बहिणीने कळकळीने पुन्हा विनंती केली. या मार्गावरची दिवटी मिळणार नाही का? असे म्हटल्यानंतर चालक भावाने कोल्हापूर ते नांदेड मार्गावरील दिवटी देण्याबाबत विनंती केली. वरिष्ठांनी त्याला होकार दिला. कोल्हापूर स्थानकातून कोल्हापूर बस (एम.एच. १४ बी.टी. ४८७२) गुरुवारी पहाटे ५ वाजता नांदेडकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, लातूरला बस आल्यानंतर भावावे बहिणीला फोन केला.

बहिण चपोली बस थांब्यावर हातात राखी, पेढा आणि ओवळण्यासाठी सजवलेलं ताट घेऊन आपल्या भावाची वाट पाहत जवळपास एक तास थांबली होती. चपोली येथे बस आल्यानंतर भावाला आणि सोबतचा सहकारी वाहक यांना खाली उतरण्यासाठी सांगितले. यावेळी रस्त्यावरच थंबूनच बहिणीने भावाला राखी बांधली आणि औक्षण केले. हा प्रसंग पाहून बसमधील प्रवासी गहिवरून गेले. जमलेल्या स्थानिक  ग्रामस्थांचे डोळेही पाणावले होते. पहिल्यांदच अनोख्या रक्षाबंधनाचा क्षण अनेकांनी पहिला. हीच ती वेड्या बहिणीची वेडी माया उपस्थितांना अनुभवायला मिळाली. 

आणि लालपरी नांदेडला गेली...या आगळ्यावेगळ्या रखी पौर्णिमेनंतर कोल्हापूरची लालपरी प्रवाशांना घेऊन नांदेडच्या दिशेने रवाना झाली. केवळ पाच ते दहा मिनिटात घडलेल्या प्रसंगाने भावा-बहिणीच्या अतूट नात्याची साक्ष दिली. हे मात्र वास्तव..!

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनstate transportएसटीlaturलातूर