शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

मनोरंजनासोबत ज्ञानाचा अनोखा खजिना!

By admin | Published: June 30, 2017 1:51 AM

अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान दररोज प्रसिद्ध होत आहे. २७ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता या उपक्रमांतर्गत स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.‘लोकमत’मध्ये रोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘संस्कारांचे मोती’ या विशेष पानात सामान्य ज्ञान, खेळ, जगातील स्मार्ट शहरांची माहिती, भाषा ज्ञान वाढवणारे कोडे, अभ्यासासाठी उपयुक्त आॅनलाइन साइट्सची माहिती असे बरेच काही आहे. ज्ञानाचा हा अनोखा खजिना आम्ही संग्रही ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कारांचे मोती’अंतर्गत आता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ती विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. अशी होईल स्पर्धा-१ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ असा स्पर्धेचा कालावधी आहे. या कालावधीत ‘लोकमत’मध्ये ‘संस्कारांचे मोती’ या पानावर रोज एक कुपन देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी हे कुपन कापून शाळांमधून वाटप करण्यात येणाऱ्या किंवा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रवेशिकेतील चौकटीत चिकटवायचे आहे. ९० पैकी कमीत कमी ८५ कुपन्स चिकटवहीत चिकटवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपली वही किंवा प्रवेशिका शाळेत ठेवलेल्या बॉक्समध्ये किंवा प्रवेशिका स्वीकृती केंद्रात १४ आॅक्टोबर २०१७ पर्यंत जमा करायची आहे. यातूनच विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात येईल.हवाई सफरीची संधी-प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रिमोट कंट्रोल ट्रान्सफॉर्मर कार, दुसऱ्या विजेत्यास सॅक तर तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकाला लंच बॉक्स देण्यात येईल. याशिवाय जिल्हानिहाय एका विद्यार्थ्यास हवाई सफरीची संधी मिळणार आहे. सोबतच उत्तेजनार्थ बक्षिसे व स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. नोव्हेंबर २०१७ अखेर बक्षिसांचे वितरण करण्यात येईल.