शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अवयवदानासाठी राज्यस्तरावर एकजूट

By admin | Published: September 26, 2016 3:13 AM

राज्यात अवयवदानाची जनजागृती होत असली, तरीही सर्व गरजू रुग्णांना अवयव मिळतील इतका अवयवदानाचा टक्का वाढलेला नाही.

मुंबई : राज्यात अवयवदानाची जनजागृती होत असली, तरीही सर्व गरजू रुग्णांना अवयव मिळतील इतका अवयवदानाचा टक्का वाढलेला नाही. अवयवदानासाठी जिल्हा, शहर पातळीवर अनेक व्यक्ती, संस्था वैयक्तिक पातळीवर करत असल्याने अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करून आता राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील अवयवदानासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था एकत्र आल्या आहेत. या एकत्रित प्रयत्नांतून राज्य अवयवदान चळवळीत अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुंबईत कार्यरत असलेल्या ‘द फेडरेशन आॅफ आॅर्गन अँड बॉडी डोनेशन’तर्फे रविवारी महाराष्ट्र सेवा संघात एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला फेडरेशनचे पुरुषोत्तम पवार यांनी ही परिषद आयोजित करण्याच्या मागील भूमिका सांगितली. अवयवदानामध्ये राज्याला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार अवयवदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी या परिषदेत व्यक्त केला. सध्या देशात अवयवदानात तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, तर दुसरीकडे श्रीलंका नेत्रदानात सर्वात पुढे आहे. श्रीलंकेतून डोळे निर्यात केले जातात. राज्य पातळीवर नेत्रदान चळवळ पुढे नेण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. अवयवदान अथवा देहदान करताना येणाऱ्या अडचणींचे कथन कार्यकर्त्यांनी केले. त्यावर उत्तर देताना डॉ. प्रवीण शिनगारे यांनी अवयवदान, देहदानातील नियमांत झालेले बदल सांगितले. डॉ. अन्वय मुळे यांनी हृदयदानाविषयी जनजागृती वाढली असून, ग्रीन कॉरिडोरसाठी पोलिसांची मदत कशी होते, हे विशद केले. नेत्रदान आणि त्वचादानात समन्वय करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सुनील केसवानी म्हणाले. राज्याला अवयवदानात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत, मोहन फाउंडेशनचे डॉ. रवी वानखडे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)या परिषदेत राज्यासह सुरत, अहमदाबाद आणि जोधपूर येथूनही तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, नाशिकच्या हृषिकेश रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, युरॉलॉजिस्ट डॉ. वत्सला त्रिवेदी, हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, नॅशनल बर्न सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील केसवानी, जे. जे. रुग्णालयाच्या शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक जोशी, मोहन फाउंडेशनचे समन्वयक डॉ. रवी वानखडे उपस्थित होते. या वेळी फेडरेशनचे सुधीर बागाईतकर, हरखचंद सावला, विनोद हरीया, मीरा सुरेश, महाराष्ट्र सेवा संघाचे चंद्रशेखर वझे यांचाही या परिषदेत सहभाग होता.