युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:08 PM2019-04-11T18:08:57+5:302019-04-11T18:18:49+5:30

युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते.

United Phosphorus Ltd. And BJP's close ties, Sachin Sawant's allegations | युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

googlenewsNext

 मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते. दरम्यान, भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे घनिष्ठ संबंध असल्याचे पुरावे आले असून, यामुळे भाजपा आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे आर्थिक लागेबांधे आहेत हे स्पष्ट होत आहे, त्यामुळे याची चौकशी कऱण्याची आवश्यकता असल्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कंपनीशी भाजपच्या असलेल्या संबंधाबाबत कितीही हात झटकले तरी पीयुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे संचालक आहेत. ही वस्तुस्थिती पीयुष गोयल यांना नाकारता येणार नाही. तसेच खा. संजय काकडे या कंपनी व्यावसायिक भागीदार आहेत ही वस्तुस्थिती कशी नाकारणार?'' 

''धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या उपाध्यक्षा श्रीमती सँड्रा आर. श्रॉफ यांची शासनाच्या वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युट (VJTI) च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. भाजप सरकारने श्रॉफ कुटुंबीयांवर ही मेहेरबानी का केली होती ? हे आता उघडकीस आले आहे,'' असे सांगत सचिन सावंत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. 

Web Title: United Phosphorus Ltd. And BJP's close ties, Sachin Sawant's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.