मुंबई - समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली.विद्यापीठाच्या अधिसभेचे आयोजन येथील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस येथे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गिरीश महाजन होते. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण उपस्थित होते.गिरीश महाजन म्हणाले की, दुर्गम आदिवासी भागांमध्ये तीन दशकांपासून अधिक काळ सेवा देणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना सन्माननीय डी. लिट् पदवी विद्यापीठातर्फे प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मिलिंद देशपांडे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला.तुटीचा अर्थसंकल्पविद्यापीठाचा सन २०१९-२०चा अर्थसंकल्प तीन प्रकारात विभागला आहे. अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित अपेक्षित उत्पन्न २१,३५३.८५ लाख रुपये तर एकत्रित खर्च २१,९२९.00 लाख रु पये अपेक्षित आहे. ५७५.१५ लाख रुपयांची वित्तीय तूट दाखविण्यात आलीआहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ देणार बंग दाम्पत्याला डी. लिट्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:59 AM