मुंबई : महाराष्ट्र विद्यापीठ अधिकारी फोरमच्या शिष्टमंडळाने नुकतीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथील ‘सेवासदन’ या निवास स्थानी भेट घेतली. या वेळी राज्यातील उच्चशिक्षणावर आणि विद्यापीठातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.फोरमने मार्च महिन्यात उच्चशिक्षणावर आधारित राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास तावडे यांनी सहमती दर्शविली. शिष्टमंडळाने भेटीदरम्यान तावडे यांच्यासोबत नवीन विद्यापीठ कायद्यावर चर्चाही केली. या बैठकीत राज्यातील विद्यापीठांतील अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत फोरमचे महासचिव डॉ. दिनेश कांबळे, कार्यालयीन सचिव विनोद माळाळे, फोरमचे सदस्य व एसएनडीटीचे उपकुलसचिव गिरीधर गजबे, मुंबई विद्यापीठ अधिकारी, असोसिएशनचे सचिव व उपकुलसचिव कृष्णा पराड इत्यादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)परिषदेत काय होणार?या परिषदेस राज्यातील १४ अकृषी विद्यापीठातील सहायक कुलसचिव, उपकुलसचिव व समकक्ष असे ४०० अधिकारी उपस्थित राहणार आहेत.नवीन विद्यापीठ कायदा, जागतिकीकरण व उच्चशिक्षण, नवे शैक्षणिक धोरण, रुसा अशा अनेक विषयांवर चर्चा होईल.
विद्यापीठ अधिकाऱ्यांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट
By admin | Published: February 09, 2016 1:08 AM