मुंबई : विद्यापीठ शतकोत्तरी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण विद्यापीठाने स्वत:ची स्वायत्ता टिकवली पाहिजे. अधिकाधिक चांगल्या अभ्यासक्रमांची आखणी केली पाहिजे. या अभ्यासक्रमांना राज्य शासनाचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या १६० व्या वर्षमहोत्सव प्रारंभ सोहळ््यात केले. मुंबई विद्यापीठाला १५९ वर्षे पूर्ण झाली. याचा शतकोत्तरी हिरक महोत्सव सोहळा सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील स्पोटर्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. यावेळी विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, बी.सी.यु.डी संचालक डॉ. अनिल पाटील, परीक्षा नियंत्रक दीपक वसावे, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठात उभारण्यात आलेल्या १५० फूट ध्वजारोहणाचा सोहळा याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.विनोद तावडे म्हणाले की, विद्यापीठाने बोली भाषांच्या संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. अनेक बोली भाषा इंग्रजी भाषेच्या हट्टापायी मागे पडल्या. पण इंग्रजीसोबतच बोलीसुद्धा टिकवण्यासाठी विद्यापीठाचा अभ्यासक्रम स्तुत्य आहे. (प्रतिनिधी)>चल सेल्फी ले ले रे...विनोद तावडे हे कालिना संकुलाच्या स्पोटर्स कॉम्पलेक्समध्ये दाखल होताच विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली. यावेळी तावडे यांनीही विद्यार्थ्यांसोबत सेल्फी पोझ देत येथील आनंद द्विगुणित केला.विद्यापीठ गीताचे ‘मराठी’त भाषांतरवसंत बापट यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या विद्यापीठ गीताचे भाषांतर डॉ. अंबुजा साळगावकर आणि अंजली निगवेकर यांनी मराठीत केले असून, त्याच्या ध्वनीमुद्रिकेचे अनावरणही यावेळी करण्यात आले.नवे अभ्यासक्रम सुरु होणारबी.ए. इन उर्दूसटीर्फिकेट कोर्स पूर्वांचल डायलेट्स(आयडॉल)मास्टर्स इन लीडरशिप सायन्सबी.ए. इन स्पोटर्स मॅनेजमेंट(गरवारे शिक्षण संस्था)एम.ए इन स्पोटर्स मॅनेजमेंट(गरवारे शिक्षण संस्था)
विद्यापीठाने स्वायत्तता टिकवावी - शिक्षणमंत्री
By admin | Published: July 19, 2016 4:22 AM