नाशिक : ‘गंगापूर बांध के यहां बॉम्ब रखा हैं’ अशा प्रकारची धमकी नाशिक तालुका पोलिसांना गुरुवारी (दि.१९) संध्याकाळी अज्ञाताकडून दुरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी गंगापूर धरणाच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बॉम्ब शोधकनाशक पथकाला कळवून गंगापूर धरण गाठले. सुमारे चार तास परिसर पिंजून काढला असता कुठल्याहीप्रकारची धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी, गंगापूर धरण सुमारे ७८ टक्के भरले असून या धरणातून संपुर्ण नाशिकला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्याच्या दुरध्वनीवर आलेल्या अज्ञात धमकीकडे कुठलेही दुर्लक्ष करणे पसंत केले नाही. तत्काळ बॉम्ब शोधक-नाशक पथकाला याबाबत सुचित करुन गंगापूर धरणाचा परिसर गाठला. सात वाजता तालुका पोलीस व बॉम्बशोधक-नाशक पथक गंगापूर धरणावर पोहचले. अत्याधुनिक धातुशोधक यंत्र, श्वान पथकाच्या माध्यमातून संपुर्ण धरणाचा परिसर पिंजून काढण्यात आला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत धरणाच्या परिसरात शोधमोहिम व तपासणी सुरू होती.
पोलिसांना अज्ञात धमकी; नाशिकच्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:48 PM
पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या पसिरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती.
ठळक मुद्देधातुशोधक यंत्र, श्वान पथकाच्या माध्यमातून संपुर्ण धरणाचा परिसर पिंजून काढण्यात आला. गंगापूर धरण सुमारे ७८ टक्के भरले आहे