शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज

By admin | Published: November 19, 2016 2:49 AM

नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे. ३०० बेडची परवानगी असताना प्रत्यक्षात जवळपास ४०० बेडचे रुग्णालय चालविले जात आहे. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर कर्मचारीवर्ग अपुरा आहे. अग्निशमन यंत्रणा बंद असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्रही रुग्णालयाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. महापालिकेचे तुर्भे व कोपरखैरणे माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. नेरूळ व ऐरोलीमधील रुग्णालये बांधून तयार आहेत, परंतु कर्मचारी व आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने ती पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. बेलापूर रुग्णालयात फक्त ओपीडी सुरू आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय हे एकमेव रुग्णालय सुरू आहे. त्यासाठी ३०० बेडची शासन मंजुरी आहे. पण प्रत्यक्षात ४०० बेडचे रुग्णालय चालविले जात आहे. शुक्रवारी रुग्णालयामध्ये ३३८ रुग्ण भर्ती झाले होते. ही संख्या अनेक वेळा ३६० ते ४०० पर्यंत जाते. वास्तविक जेवढे रुग्ण दाखल असतील त्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय व इतर कर्मचारीवर्ग आवश्यक असतो. सद्यस्थितीमध्ये ३०० बेडसाठीही नियमाएवढे कर्मचारी उपलब्ध नाहीत. वाढीव बेड टाकल्यानंतर प्रत्यक्षात त्यांना योग्य सुविधा देता येत नाहीत. खासगी रुग्णालयांनी परवानगीपेक्षा एक बेड जास्त टाकला तरी पालिकेचा आरोग्य विभाग त्यांना नोटीस देते. त्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला जातो. पण प्रत्यक्षात स्वत:च्या रुग्णालयामध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करताना त्यांच्याकडे अग्निशमन विभागाचे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण दिले आहे. पण प्रत्यक्षात प्रथम संदर्भ रुग्णालयाकडेही या परवानग्या नाहीत. माता बाल रुग्णालयासाठीही परवानगी नाही. या नियमाप्रमाणे महापालिकेवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले जात आहे. पालिका रुग्णालयामधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे मशीन १५ दिवसांपासून बंद आहे. शस्त्रक्रियेसाठी अनेक नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. आयसीयूमध्ये फक्त पाचच रुग्णांना ठेवता येते. एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटर बंद आहे. रुग्णालयातील चारपैकी दोन लिफ्ट सुरू आहेत. लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्तीच केलेली नाही. एक्सरे मशीनही बंद आहे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींची मागणी करूनही पूर्तता केली जात नाही. पालिका प्रशासनाला स्वत:च्या रुग्णालयांचा कारभार सुधारण्यास अपयश आले असल्याची तक्रार शासनाकडे केली आहे. >महापालिकेवर कारवाई कोण करणार?शहरातील खासगी रुग्णालयांनी एक बेड जास्त ठेवला तरी त्यांना महापालिका नोटीस पाठविते. त्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या रुग्णालयात तब्बल १०० बेड जास्त ठेवले आहेत. शुक्रवारीही क्षमतेपेक्षा ३८ रुग्ण जास्त भर्ती केले होते. डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे अग्निशमन दलाचे व एमपीसीबीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण ही दोन्हीही प्रमाणपत्रे महापालिकेच्या रुग्णालयांकडेही नाहीत. यामुळे आता महापालिका रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णालयामध्ये आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याविषयी शिवसेनेचे तुर्भे नाका येथील शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. मनपा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना त्रास होत असल्याचे स्पष्ट केले आहे. >महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मंजुरीपेक्षा जास्त बेड ठेवले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. रुग्णालयाकडे अग्निशमन व पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र नाही. पूर्णपणे नियमबाह्यपणे कामकाज सुरू असून आयुक्तांनी सर्वप्रथम रुग्णालयांचे कामकाज नियमाप्रमाणे चालवून मग इतरांवर कारवाई करावी. - संजू वाडे, आरोग्य समिती सदस्य>प्रथम संदर्भ रुग्णालयातील वास्तव १०० बेडची परवानगी; प्रत्यक्षात मात्र ४०० बेड एनआयसीयू विभागातील सर्व व्हेंटिलेटर बंद अतिदक्षता विभागातील पाच व्हेंटिलेटर बंद मोतीबिंदू शस्त्रक्रिया मशीन १५ दिवसांपासून बंद रुग्णालयात औषधांचा तुटवडा एक्सरे मशीन अनेक दिवसांपासून बंद