काही लाखांमध्ये मिळणारी Harley Davidson ची सुपर बाईक पाहून भल्याभल्यांची तिच्यावरून नजर हटत नाही. काहींना तर त्यावरून फेरफटका मारायचा मोहही आवरत नाही. यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचे मराठमोळे सरन्यायाधीश शरद बोबडेंचे नावही आले आहे. बोबडेंचे Harley Davidson सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरला आले आहेत. अनलॉक १ मध्ये सूट दिलेली असल्याने रविवारी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. याचवेळी त्यांना हार्ले डेव्हिडसनची धाकड बाईक दिसली आणि त्यांना ती बाईक पाहण्याचा मोह आवरला नाही. सोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा होता. बोबडे यांनी त्या बाईकच्या मालकाशी संवाद साधला. दस्तुरखुद्द सरन्यायाधीशच विचारत आहेत म्हटल्यावर तो देखील शॉक झाला.
सरन्यायाधीश या बाईकपाशी थांबताच तिथे उपस्थितांच्या नजराही त्याकडे वळल्या. बोबडे हार्ले डेव्हिडसनवर बसताच सर्वांच्या हाती मोबाईल आले आणि त्यांनी हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. सरन्यायाधीश शरद बोबडे सध्या नागपूरमध्ये त्यांच्या घरी आहेत. तेथूनच ते सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या खटल्यांची सुनावणी घेत आहेत.
बोबडे यांना फोटोग्राफी, क्रिकेट आणि पुस्तक वाचनाचा छंद आहे. मात्र, रविवारी त्यांच्या आणखी एका आवडीबाबत लोकांना समजले. शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश आहेत. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यानंतर 18 नोव्हेंबर 2019 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. बोबडे यांचा कार्यकाळ 17 महिन्यांचा आहे. 23 एप्रिल 2021 मध्ये ते निवृत्त होणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेले मजूर, कोरोना व्हायरच्या चाचण्यांची सुविधा, भगवान जगन्नाथ रथयात्रा सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले आहेत. याचबरोबर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी नियमांचे पालन करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
असाही योगायोग...
नागरिकांच्या सुविधेकरिता नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाही, पण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर भूमीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावरील सुनावणीचा स्पर्श झाला. नागपूरातील हा पहिलाच प्रसंग आहे. नागपूरच्या सुवर्ण इतिहासात त्याची नोंद होणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न
Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला
बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का
India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे
पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी