सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यात झालेल्या युवतीच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून चुलत भावानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली.
हुंबरट धोब्याचे पाणी येथे 21 ऑक्टोबर रोजी अनोळखी युवतीचा मृतदेह आढळला होता. कळवा पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून युवतीची नोंद झाली असल्याचे कणकवली पोलीस निरीक्षक रानमाळे यांनी ‘व्हॉट्स अॅप’वर पोलीस खात्यात खुनासंदर्भात दिलेल्या माहितीला प्रतिसाद मिळाल्याने युवतीची ओळख पटली. वारगांव येथील अर्चना वसंत वळंजू (26) होती. ती मुंबईत अंधेरी एअरपोर्टला हाऊसकिपिंग विभागात कामाला होती. ती आपल्या बहिणीकडे कळवा येथे राहत होती, तर संशयित आनंद मधुकर वळंजू (3क्) हा तिचा चुलतभाऊ असून त्याचे अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून ती गर्भवती होती. अर्चनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात 25 ऑक्टोबरला देण्यात आली होती. तिने आनंदजवळ आपण गर्भवती असल्याने औषधोपचारासाठी 25 हजार रुपये मागितले होते. नांदगाव येथून आनंदने तिला हुंबरटला नेले व तेथे तिचा धारदार हत्याराने खून केला असल्याची माहिती संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)